टीम इंडियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे कोच मिकी आर्थर यांनी केला मोठा खुलासा

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 25, 2019 | 11:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

IND vs PAK, World Cup 2019: पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर यांनी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर एक मोठा खुलासा केला आहे. भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर त्यांची काय परिस्थिती होती यावर भाष्य केलंय.

Mickey Arthur wanted to commit suicide
पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर  |  फोटो सौजन्य: AP

लंडन: वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी हाय व्होल्टेज मॅच झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर आपल्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता असा धक्कादायक खुलासा पाकिस्तानच्या टीमचे कोच मिकी आर्थर यांनी केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर सोशल मीडियात चांगलीच टीका होत होती तसेच खिल्लीही उडवण्यात आली होती. सरफराज अहमद याच्या नेत्रृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानच्या टीमला मॅन्चेस्टर येथे झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाकडून 89 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता.

विराट कोहलीच्या नेत्रृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 336 रन्स केले. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या टीमला पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 40 ओव्हर्समध्ये 302 रन्स करण्याचं आव्हान मिळालं. पाकिस्तानच्या टीमला 40 ओव्हर्समध्ये 212 रन्स पर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचपूर्वी सांगितले की, गेल्या रविवारी माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता.

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यावर पाकिस्तान क्रिकेट टीमने जोरदार पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 49 रन्सने परावव केला आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. पाकिस्तानच्या टीमला आता आपल्या उर्वरित सर्वच मॅच जिंकायच्या आहेत आणि त्यासोबतच इतर टीम्सच्या परफॉर्मन्सवर देखील पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भविष्य अवलंबून आहे. पाकिस्तानच्या पुढील मॅचेस आता न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध आहेत.

दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या हॅरिस सोहेल याने चांगलं प्रदर्शन केलं. त्याने 59 बॉल्समध्ये 89 रन्सची खेळी खेळली. बाबर आझम याने सुद्धा हाफ सेंच्युरी केली. न्यूझीलंड विरुद्ध मॅचच्या आधी पाकिस्तानचे कोच मिकी आर्थर यांनी म्हटलं, जर पाकिस्तानला न्यूझीलंडचा पराभव करायचा असेल तर आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दाखवावं लागेल. मला माहिती आहे की पाकिस्तानची टीम न्यूझीलंडचा पराभव करु शकते. आम्हाला अद्यापही आशा आहे आणि सेमीफायनलच्या शर्यतीत आहोत. आम्ही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दाखवलं तर कुठल्याही टीमचा पराभव करु शकतो यात मला शंका नाहीये.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
टीम इंडियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे कोच मिकी आर्थर यांनी केला मोठा खुलासा Description: IND vs PAK, World Cup 2019: पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर यांनी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर एक मोठा खुलासा केला आहे. भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर त्यांची काय परिस्थिती होती यावर भाष्य केलंय.
Loading...
Loading...
Loading...