पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

pakistan cricket team depart for england पाकिस्तानचा २० क्रिकेटपटू आणि ११ सपोर्ट स्टाफ असा ३१ जणांचा संघ इंग्लंडला रवाना झाला.

pakistan cricket team depart for england
पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना
  • इंग्लंडमध्ये पाकिस्तानचे खेळाडू १४ दिवस क्वारंटाइन होणार
  • पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने होणार

लाहोर: पाकिस्तानचा २० क्रिकेटपटू आणि ११ सपोर्ट स्टाफ असा ३१ जणांचा संघ (pakistan cricket team) इंग्लंड (england) दौऱ्यावर रवाना झाला. विमानात बसल्यावर उपकर्णधार बाबर आझम याने निवडक सहकाऱ्यांसोबत ग्रुप सेल्फी काढून ट्वीट केला. 

इंग्लंडमध्ये पाकिस्तानचे खेळाडू १४ दिवस क्वारंटाइन होणार

पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे उतरणार आहेत. तिथून हे खेळाडू विशेष बसने वॉर्सेस्टरशायर येथे जातील आणि १४ दिवस क्वारंटाइन राहतील. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर खेळाडूंची पुन्हा चाचणी होईल. ही चाचणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड करणार आहे. या चाचणीत ज्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांचाच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी विचार होणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये पॅव्हेलियनमधून मैदानात जाताना प्रत्येकवेळी सर्व खेळाडू आणि पंच (अंपायर) यांना ताप आहे की नाही हे तपासले जाणार आहे. एखाद्याला बरे वाटत नसल्यास लगेच त्याला वैद्यकीय मदत दिली जाणार आहे. खेळाडू प्रशिक्षण आणि सराव सामने खेळतील नंतर मुख्य स्पर्धा सुरू होणार आहे. पाकिस्तानचा संघ १३ जुलै रोजी डर्बीशायर येथे जाणार आहे.

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने होणार 

इंग्लंडमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ३ कसोटी सामने आणि ३ टी-२० सामने होणार आहेत. याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात फेब्रुवारी महिन्यात शेवटचा कसोटी सामना झाला होता. कोरोना संकटामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना बरेच दिवस सराव करणे शक्य झाले नव्हते. या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडू आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करू असा विश्वास पाकिस्तानच्या खेळाडूंनी व्यक्त केला. 

पाकिस्तानचा २० क्रिकेटपटूंचा संघ -

अजहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफिक, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाद वसिम, इमाम उल हक, खुशिल शाह, मोहम्मद अब्बास, मुसा खान, नसिम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी, यासीर शाह

डावखुरा फिरकीपटू झफर गोहर थेट इंग्लंडमध्ये संघात सहभागी होणार आहे. मात्र तो पाकिस्तानच्या संघासोबत फक्त सराव सामने खेळणार आहे. 

पाकिस्तानचे आणखी काही खेळाडू लवकरच इंग्लंडला जाण्याची शक्यता

पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यावर जाणार असलेले पण सलग दोन कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले तसेच पहिल्या चाचणीत पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या चाचणीत निगेटिव्ह आढळलेले खेळाडू सध्या पाकिस्तानमध्येच आहेत. ज्यांच्या सलग दोन चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत अशा खेळाडूंवर उपचार सुरू आहेत. ज्या खेळाडूंची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली त्या खेळाडूंना लवकरच तिसरी कोरोना चाचणी करुन घ्यावी लागेल. या चाचणीत निगेटिव्ह आल्यास त्या खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर पाठण्याचा विचार करत असल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले. कोरोना संकटामुळे इंग्लंड दौऱ्यावर जास्त खेळाडू पाठवण्याची योजना आहे, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी