पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतात येणार

मोदी सरकारने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर येण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयने आयसीसीला कळवली.

Pakistan cricket team will get visas to play T20 World Cup in India
पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतात येणार 

थोडं पण कामाचं

 • पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतात येणार
 • टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होऊ शकेल पाकिस्तान
 • बीसीसीआयने आयसीसीला दिली माहिती

नवी दिल्ली: मोदी सरकारने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर येण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयने आयसीसीला कळवली. मात्र पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना भारतात येण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. Pakistan cricket team will get visas to play T20 World Cup in India

भारताचे सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान फक्त भारतासोबत खेळण्यासाठी दौऱ्यावर कधी येणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात येऊ शकेल. 

टी २० वर्ल्ड कप ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. भारत या स्पर्धेचा यजमान आहे. या स्पर्धेत भारतासह वेगवेगळ्या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार होणार असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तान हा पण एक संघ आहे. याच कारणामुळे टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात येण्याची परवानगी मोदी सरकारने दिली आहे.

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मधील परिस्थितीचा आढावा घेऊन घेतले जातील. आधी ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत होणार होती. मात्र जगावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन २०२१ पर्यंत पुढे ढकलले. आता २०२१मध्ये भारत आणि २०२२मध्ये ऑस्ट्रेलिया टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करेल असे आयसीसीने जाहीर केले. मात्र या दोन्ही स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ दरम्यान कोरोनाची स्थिती कशी आहे याचा आढावा घेऊन भारतातील टी २० वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचे पुढील निर्णय घेतले जातील.

आतापर्यंत झालेले टी २० वर्ल्ड कप आणि त्यांचे विजेते

 1. २००७ - यजमान देश दक्षिण आफ्रिका - विजेता भारत - उपविजेता पाकिस्तान
 2. २००९ - यजमान देश इंग्लंड - विजेता पाकिस्तान - उपविजेता श्रीलंका
 3. २०१० - यजमान देश वेस्ट इंडिज - विजेता इंग्लंड - उपविजेता ऑस्ट्रेलिया
 4. २०१२ - यजमान देश श्रीलंका - विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता श्रीलंका
 5. २०१४ - यजमान देश बांगलादेश - विजेता श्रीलंका - उपविजेता भारत
 6. २०१६ - यजमान देश भारत - विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता इंग्लंड
 7. २०२१ - यजमान देश भारत
 8. २०२२ - यजमान देश ऑस्ट्रेलिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी