Asia Cup: भारत, पाकिस्तान आणि UAE मध्ये नाही तर या देशात होऊ शकते आशिया चषक स्पर्धा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 17, 2023 | 14:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asia Cup 2023: आशिया चषकाच्या आयोजनावरुन अजूनही संभ्रम कायम आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाचं वातावरण आणि राजकीय संबंध यामुळे भारताला आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जायचं नाही, तसं भारताने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

Pakistan cricketer Shoaib Akhtar Suggests New Venue For Asia Cup 2023
Asia Cup: भारत, पाकिस्तान आणि UAE मध्ये नाही तर या देशात होणार आशिया चषक स्पर्धा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शोएब अख्तरने आशिया चषकाच्या यजमानपदावर आपलं मत मांडलं
  • बीसीसीआय आणि पाकिस्तान बोर्ड घेणार अधिकृत निर्णय
  • भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण

Shoaib Akhtar On Asia Cup 2023: आशिया चषकाच्या आयोजनावरुन अजूनही संभ्रम कायम आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाचं वातावरण आणि राजकीय संबंध यामुळे भारताला आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जायचं नाही, तसं भारताने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तर भारताने पाकिस्तानात यावं, अशी पाकिस्तान बोर्डाची इच्छा आहे. पण आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

अधिक वाचा: IND vs AUS : भारत सलग चौथ्यांदा जिंकला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC च्या फायनलमध्ये दाखल

अशातच आता पाकिस्तानचा एकेकाळचा स्टार क्रिकेटर शोएब अख्तरने आशिया चषकाच्या यजमानपदावर आपलं मत मांडलं आहे.अख्तरने सांगितलं की, जर दोन्ही बोर्ड आशिया चषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेऊ शकत नसतील तर स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवणं हाच चांगला उपाय आहे. 

अधिक वाचा: IND vs AUS 1st ODI Live Score: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे, जाणून घ्या कुठे पाहू शकता LIVE Streaming 

सध्या शोएब अख्तर दोहामध्ये लिजेंड्स क्रिकेट लीग खेळत असून तो आशिया लायन्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. यावेळी एएनआयने आशिया चषकाच्या आयोजनाबाबत शोएब अख्तरला प्रश्न विचारला होता. तो म्हणाला, 'मला आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित करायचा आहे, पण हे जर शक्य नसेल, तर श्रीलंकेने आवश्य त्याचं आयोजन करावं.' 

याशिवाय शोएब पुढे म्हणाला, माझं मत आहे की,  आशिया चषकच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या टीम पोहोचाव्यात. इतकंच नाही तर दोन्ही संघामध्ये वर्ल्डकपचीही फायनल मॅच व्हावी. जागतिक स्तरावर जर भारत आणि पाकिस्तानचे संघ पोहोचत असेल तर कमाल होऊन जाईल. 

अधिक वाचा: IND vs AUS 1st ODI: पहिल्या वनडेत पाऊस करणार बॅटिंग? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

यापूर्वी आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानचा संघ पोहोचला होता, यात श्रीलंकेने 23 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर आता सप्टेंबर 2023 मध्ये यंदाचा आशिया चषक नियोजित आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि पाकिस्तान बोर्ड आशिया चषकाच्या यजमानपदाचा अधिकृत निर्णय कधी घेतात हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी