India vs Zimbabwe 3rd ODI: केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Indian team) झिम्बाब्वेविरुद्धची (Zimbabwe) वनडे मालिका (ODI series) 3-0 ने जिंकली. शुभमन गिल (Shubman Gill) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने तिसरा एकदिवसीय सामना 13 धावांनी जिंकला. हरारे येथे भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 289 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 49.3 षटकांत 276 धावा करून सर्वबाद झाला. दरम्यान या विजयामुळे पाकिस्तान संघाचे टेन्शन वाढलं आहे. कारण टीम इंडियाने पाकिस्तानच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने क्लीन स्वीप केला. यासह भारतीय संघाने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 54 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 62 सामने खेळले असून 54 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने उभा आहे.
Read Also : ईडीची पीडा दूर होण्यासाठी जॅकलिन देवाच्या दारी
भारतीय वेगवान गोलंदाजांनी शानदार खेळ दाखवला. एकेकाळी सिकंदर रझाच्या जोरावर झिम्बाब्वेचा संघ सहज जिंकेल असे वाटत होते, पण त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर शुभमन गिलने अप्रतिम झेल टिपला, त्यामुळे तो बाद झाला. भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. आवेश खानने सर्वाधिक ३ बळी घेतले. दीपक चहर, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी 2-2 विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या.
Read Also : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण राहुलला मोठी खेळी खेळता आली नाही. त्याचवेळी धवनने 40 धावा केल्या. यानंतर इशान किशन आणि शुभमन गिल यांनी मिळून मोठी भागीदारी केली. इशान किशनने 50 धावा केल्या. त्याचवेळी शुभमन गिलने 130 धावांची तुफानी इनिंग खेळली. या खेळाडूंच्या जोरावरच भारतीय संघ विजयी धावसंख्या मिळवू शकला.