IND vs NZ: कानपूरच्या मैदानावर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, video viral

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 25, 2021 | 14:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NZ Kanpur Test: व्हायरल झालेला व्हिडिओ भारताच्या सहाव्या ओव्हरमधील आहे. यात शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल बॅटिंग करत आहेत. तर काईल जॅमीसन गोलंदाजी करत आहे. 

india vs new zealand
VIDEO: कानपूरच्या मैदानावर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होत आहे. 
  • कानपूर कसोटीची एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. 
  • व्हिडिओमध्ये चाहते पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. 

कानपूर: भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील(test series) पहिला सामना कानपूरच्या(kanpur) ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ(video) ट्विटरवर(viral on twitter) व्हायरल होत आहे. यात क्रिकेट चाहते 'पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद...(pakistan murdabad)अशा घोषणा देत आहे. सीमेच्या पलीकडे पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील नातेसंबंध तणावात आहेत. याचा परिणाम क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळाला. pakistan murdabad slogan at india vs new zealand kanpur test

दररोज नव्या दिवशी काश्मीरवरून काही ना काही कुरापती करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये क्रिकेट चाहते बराच वेळा पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. व्हायरल झालेला हा व्हिडिओ भारताचा डाव सुरू असतानाचा सहाव्या ओव्हरमधील आहे. यावेळी शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल बॅटिंग करत होते. तर काईल जॅमीसन गोलंदाजी करत होता. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळेही टीम इंडियावर जोरदार टीका करण्यात आली होती. 

सामन्यात अजिंक्य रहाणे केन विल्यमसन्सच्या किवी संघाविरुद्ध टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ विराट कोहली(दुसऱ्या कसोटीत खेळणार), रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि दुखापतग्रस्त लोकेश राहुलशिवाय मैदानात उतरला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी येथे फलंदाजीत युवा खेळाडूंना पारखण्याची चांगली संधी आहे. 

गेल्या कसोटी मालिकेत  अश्विन (27) आणि जडेजा (14) ने इतक्या विकेट मिळवल्या होत्या. ज्यामुळे न्यूझीलंडला ३-० असे हरवले होते. जर पिच २०१६प्रमाणे असेल तर अश्विन, जडेजा आणि अक्षऱ पटेल या तिघांनाही संधी मिळण्याची आशा आहे. यांनीी या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत २७ विकेट घेतल्या होत्या. 

प्लेइंग इलेव्हन

भारत: मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव. 

न्यूझीलंड: टॉम लॅथम, विल यंग, केन विलियमसन (कर्णधार),  रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचिन रविंद्र, काइल जॅमीसन, विल सोमरविले, टीम साउदी, अयाज पटेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी