PAK vs SA: पाकिस्तानच्या 3 बॉलमध्ये पडल्या 3 विकेट, तरीही नाही हॅटट्रिक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2022 | 11:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pakistan vs South Africa:पाकिस्तानने द. आफ्रिकेला 33 धावांनी हरवले. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाचे तीन बॉलमध्ये 3 विकेट पडल्या. मात्र तरीही द. आफ्रिकेचा गोलंदाज हॅटट्रिक करू शकला नाही. 

pakistan vs south africa
पाकिस्तानच्या 3 बॉलमध्ये पडल्या 3 विकेट, तरीही नाही हॅटट्रिक 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिकेसाठी डावातील 19वी ओव्हर एनरिच नॉर्कियाने टाकली.
  • या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर शादाब खानला सिक्स ठोकण्याच्या नादात ट्रिस्टन स्टब्ससच्या हाती कॅच देत बाद झाला.
  • यानंतर पुढील बॉलवर मोहम्मद वसीला एनरिच नॉर्कियाचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या हाती कॅच देत बाद केला.

मुंबई: पाकिस्तानी संघाने(pakistani team) द. आफ्रिकेविरुद्ध(south africa) एकतर्फी 33 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत आहेत. पाकिस्तानसाठी शादाब खानने(shadab khan) शानदार खेळ केला. मात्र सामन्यातील सलग तीन बॉलमध्ये पाकिस्तानी संघाच्या तीन विकेट पडल्या. मात्र त्यानंतरही द. आफ्रिकेच्या गोलंदाजाची हॅटट्रिक पूर्ण झाली नाही. जाणून घ्या...pakistan took 3 wickets in 3 balls, but not make hattrick

अधिक वाचा - टी20 वर्ल्ड कपमध्ये आग ओकतोय हा 23 वर्षांचा गोलंदाज

3 बॉलमध्ये 3 विकेट

द. आफ्रिकेसाठी डावातील 19वी ओव्हर एनरिच नॉर्कियाने टाकली. या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर शादाब खानला सिक्स ठोकण्याच्या नादात ट्रिस्टन स्टब्ससच्या हाती कॅच देत बाद झाला. यानंतर पुढील बॉलवर मोहम्मद वसीला एनरिच नॉर्कियाचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या हाती कॅच देत बाद केला. त्यानंंतर 20व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर कॅगिसो रबाडाने इफ्तिखार अहमदला रिली रोसोच्या हाती कॅच आऊट केले. या तीन बॉलवर तीन विकेट पडल्या बॉलवर तीन विकेट पडले. मात्र या विकेट दोन गोलंदाजांनी मिळून हे पूर्ण केले. या कारणामुळे हॅटट्रिक होऊ शकली नाही. 

पाकिस्तानी फलंदाजांनी दाखवला दम

पाकिस्तानची सुरूवात खराब राहिली. जेव्हा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान स्वस्तात माघारी परतले. यानंतर मोहम्मद नवाज आणि इफ्तिखार अहमदने शानदार खेळी केल्या. शादाब खानने 52 धावा केल्या. इफ्तिखार अहमदने 51 धावांची खेळी केली. या दोन्ही कारणामुळे पाकिस्तानी संघाला 20 ओव्हरमध्ये एकूण 185 धावा करण्यात यशस्वी झाले. 

द. आफ्रिकेला मिळाला पराभव

द. आफ्रिका संघाची सुरूवात चांगली नाही राहिली. जेव्हा स्टार ओपनर क्विटन डी कॉक धाव न करता बाद झाला. द. आफ्रिकेकडून स्टार फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि संपूर्ण संघाला केवळ 108 धावा करता आल्या. द. आफ्रिकेचा डकवर्थ लुईसनुसार 33 धावांनी पराभव झाला. 

अधिक वाचा - पाक अभिनेत्री झिम्बाब्वेच्या खेळाडूसोबत करणार लग्न, पण...

बदलले समीकरण

दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवामुळे चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचे 4 सामन्यात 5 पॉईंट झाले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.भारतीय संघ चार सामन्यांत 3 विजयांसह 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा अखेरचा सामना 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकल्यास ते सहज सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी