World Cup Super League Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचे झाले मोठे नुकसान; पाहा आकडेवारी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 11, 2022 | 09:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC Men's Cricket World Cup Super League 2020-2023 । पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या वेस्टइंडिजचा दारूण पराभव केला. या विजयासोबतच पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये जाण्यासाठी त्यांची मोहीम सुरूच ठेवली आहे.

pakistan victory caused great loss to indian team, see point table
पाकिस्तानच्या विजयाने भारताचे झाले मोठे नुकसान, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या विजयाने भारताचे झाले मोठे नुकसान.
  • पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या वेस्टइंडिजचा दारूण पराभव केला.
  • भारतीय संघाची टॉप ५ मधून सहाव्या स्थानावर घसरण झाली.

ICC Men's Cricket World Cup Super League 2020-2023 । मुंबई : पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या वेस्टइंडिजचा दारूण पराभव केला. या विजयासोबतच पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये जाण्यासाठी त्यांची मोहीम सुरूच ठेवली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२० धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानने WCSL च्या गुणतालिकेत तीन स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंग्लंड आता पाकिस्तानच्या वर आहेत. दुसरीकडे वेस्ट इंडिजबद्दल भाष्य करायचे झाले तर पराभवानंतर त्यांची एका स्थानावरून घसरण झाली आहे आणि ते चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले आहेत. (pakistan victory caused great loss to indian team, see point table). 

अधिक वाचा : भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी, शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव

पाकिस्तानच्या विजयाने भारताचे झाले मोठे नुकसान

वेस्टइंडिजविरूद्ध पाकिस्तानच्या विजयामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. कारण या सामन्यापूर्वी भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होता, पण सामन्याच्या निकालानंतर भारतीय संघाची टॉप ५ मधून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच याचा फारसा भारतीय संघावर परिणाम होणार नाही कारण २०२३ च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे त्यामुळे भारत थेट क्वालिफाय करेल.

अन्य संघाबद्दल भाष्य करायटे झाले तर, भारताच्या मागे ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स हे संघ आहेत. फेब्रुवारीमध्ये भारत आणि वेस्टइंडिजमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर ५० षटकांचे सामने खेळणार असून त्यादरम्यान भारतीय संघाचे लक्ष्य गुणतालिकेत सुधारणा करण्यावर असणार आहे. 

काय आहे वर्ल्ड सुपर लीग

वर्ल्ड सुपर लीग ही आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगची पहिलीच आवृत्ती आहे. या लीगद्वारे भारताव्यतिरिक्त इतर ७ संघ २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट क्वालिफाय करतील. तर उर्वरित दोन संघ विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून निवडले जातील. लक्षणीय बाब म्हणजे सुपर लीगमध्ये एकूण १३ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर ४ आणि बाहेर ४ म्हणजे एकूण ८ मालिका खेळण्याची संधी मिळेल. प्रत्येक मालिकेत एकूण ३ सामने होतील. विजेत्या संघाला १० गुण मिळतील बरोबरीचा सामना ठरल्यास ५ गुण दिले जातील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी