पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या ड्रा सामन्याचा काय झाला परिणाम?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 01, 2023 | 19:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

pak vz nz : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ड्रा झाल्यामुळे पाकिस्तानची फायनलमध्ये खेळण्याची आशा संपली आहे. कसोटीचा निर्णय ड्रा लागल्यामुळे दोंन्ही संघांना प्रत्येकी केवळ चार गुण मिळाले आहेत. या सगळ्या गोळाबेरजेमुळे पॉइंट टेबलचे चित्र काहीसे असे आहेः 

पाकिस्तानवर पराभवाचा ठप्पा बसणार होता?
Pakistan vs New Zealand - highlights  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंतिम सामना कोण खेळणार?
  • पाकिस्तानवर पराभवाचा ठप्पा बसणार होता?
  • भारताचे स्थान कितवे?

pak vs nz : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने दिवसेंदिवस अधिकाधिक रोमांचक होत आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना कराचीमध्ये खेळला गेला होता. अखेरीस या पाच दिवसीय सामन्याचा निकाल लागलाच नाही. त्या अनिर्णित सामन्यामुळे WTC पॉइंट्स टेबलवर नेमका काय परिणाम झाला आहे, त्याचा आढावा घेऊया - (Pakistan vs New Zealand - highlights, who'll play in the finals?)

बाबर कुठे चुकला?

पहिल्या डावात ४३८ धावा केल्यानंतर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात अनिर्णित खेळताना दिसला. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करत ६१२ धावा केल्या. इथे बाबरची ढिसाळ कप्तानी पाहायला मिळाली. या सामन्यात पाकिस्तान कमजोर दिसत होता. अखेरीस अव्यवस्थित प्रकाशनियोजनामुळे बाबर आणि संघावर पराभवाचा ठप्पा बसला नाही. 

अधिक वाचाः 10वी, 12वीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

पहिला नंबर कोणाचा?

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ड्रा झाल्यामुळे पाकिस्तानची फायनलमध्ये खेळण्याची आशा संपली आहे. कसोटीचा निर्णय ड्रा लागल्यामुळे दोंन्ही संघांना प्रत्येकी केवळ चार गुण मिळाले आहेत. या सगळ्या गोळाबेरजेमुळे पॉइंट टेबलचे चित्र काहीसे असे आहेः 

अधिक वाचाः जानेवारी 2023 मधील व्रत सण जयंती पुण्यतिथी महत्त्वाचे दिवस

अव्वल स्थानावर आहे तो दहा विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया, 78.57 टक्के गुणांसह. अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच खेळणार हे नव्याने सांगायला नको. बांग्लादेशचा 2-0 असा धुव्वा उडवल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान भारताच्या पदरात पडले आहे. इतर संघांकडे डोकावून पाहिल्यास श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका चौथ्या तर इंग्लंड पाचव्या नंबरवर आहे. पाकिस्तानाला त्याच्याच होमग्राऊंडवर  ३८.४६ गुणांसह इंग्लंडने धूळ चारली होती. त्या पराभवामुळे आता पाकिस्तान सातव्या स्थानावर असून न्यूझीलंड आठव्या स्थानावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी