PAK vs WI: पाकिस्तानने रचला इतिहास! वेस्टइंडिजविरूद्ध जिंकली सलग १० वी एकदिवसीय मालिका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 11, 2022 | 10:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

PAK vs WI Series | बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना १२० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तसेच दुसऱ्या सामन्याच्या विजयासह पाकिस्तानने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

Pakistan wins 10th consecutive ODI series against West Indies
पाकने वेस्टइंडिजविरूद्ध जिंकली सलग १० वी एकदिवसीय मालिका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • पाकने वेस्टइंडिजविरूद्ध जिंकली सलग १० वी एकदिवसीय मालिका.
 • पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिजचा दारूण पराभव केला.
 • पाकिस्तान संघाने गेल्या १० द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत चार वेळा वेस्टइंडिजचा ३-० अशा फरकाने पराभव केला आहे.

PAK vs WI Series | नवी दिल्ली : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना १२० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तसेच दुसऱ्या सामन्याच्या विजयासह पाकिस्तानने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने ही सलग १० वी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. (Pakistan wins 10th consecutive ODI series against West Indies). 

२९ वर्षांपूर्वी पाकिस्तान शेवटच्या वेळी विंडीजकडून पराभूत

पाकिस्तानचा वेस्टइंडिजविरूद्ध शेवटचा पराभव १९९१ साली इम्रान खानच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडिजविरूद्ध झाला होता. त्यानंतर आतापर्यंत २९ वर्षे पाकिस्तानचे वेस्टइंडिजविरूद्ध वर्चस्व आहे. पाकिस्तानने दोघांमधील शेवटच्या ११ पैकी १० मालिका जिंकल्या आहेत आणि १ वेळा (१९९२/९३ मध्ये) २-२ अशा बरोबरीत राहिली होती. 

अधिक वाचा : मान्सून दमदार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

१९९१ ते २०२२ दरम्यान पाकिस्तान आणि वेस्टइंडिज यांच्यामधील एकदिवसीय मालिकेचा निकाल

 1. २०२२           पाकिस्तान २-०(३*)
 2. २०१७           पाकिस्तान २-१(३)
 3. २०१६-१७      पाकिस्तान ३-०(३)
 4. २०१३            पाकिस्तान ३-१(५)
 5. २०११           पाकिस्तान ३-२(५)
 6. २००८-०९      पाकिस्तान ३-०(३)
 7. २००६-०७      पाकिस्तान ३-१(5)
 8. २००५           पाकिस्तान ३-०(३)
 9. २००१-०२      पाकिस्तान २-१(३)
 10. १९९९           पाकिस्तान ३-० (३)
 11. १९९२-९३       बराबर २-२ (५)
 12. १९९१-९२       वेस्टइंडीज २-० (३) 

१९९९ पासून विजयाला सुरूवात

१९९१-९२ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत इम्रान खानच्या नेतृत्वाखालील यजमान संघाचा २-० अशा फरकाने पराभव झाला होता. यानंतर १९९२-९३ मध्ये वेस्टइंडिमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत संपली होती. यानंतर कॅनडामध्ये १९९९ मध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने विंडीजचा ३-० असा पराभव केला. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तानची द्विपक्षीय विजयी मालिका सुरू झाली जी आजही सुरू आहे.

पाकिस्तानचे वर्चस्व कायम 

पाकिस्तान संघाने गेल्या १० द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत चार वेळा वेस्टइंडिजचा ३-० अशा फरकाने पराभव केला आहे. यादरम्यान वेस्टइंडिजला केवळ ६ सामने जिंकता आले तर २८ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर एका सामन्याचा निकाल अनिर्णित ठरला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी