Sehar Shinwari: पाक अभिनेत्री झिम्बाब्वेच्या खेळाडूसोबत करणार लग्न, पण मोबदल्यात तिला हवी 'ही' गोष्ट

दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाक संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु बांगला देशविरुद्धचा सामना पाकला जिंकावा लागणार याचं टेन्शन असताना पाक अभिनेत्रीने एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे अनेकांचा फोकस दूर झाला आहे. तिच्या या ट्विटने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Pakistani actress to marry Zimbabwean player, but...
पाक अभिनेत्री झिम्बाब्वेच्या खेळाडूसोबत करणार लग्न, पण...  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमध्ये कायम राहिला आहे.
  • पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने झिम्बाब्वेच्या खेळाडूंना खुली ऑफर दिली आहे.
  • झिम्बाब्वेने भारताला हरवलं तर सेहर शिनवारी झिम्बाब्वे मुलासोबत लग्न करेल.

Pakistani actress Sehar Shinwari : सध्या  T20 World Cup रंगतदार स्थितीत आला आहे. भारतासह 
(India) पाकिस्तानातील (Pakistan) अनेकांची धकधक वाढली आहे. कारण भारताला उपांत्य फेरीत येण्यासाठी झिम्बाब्वेला (Zimbabwe) पराभूत करावं लागेल. तर पाकिस्तानला पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाक संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु बांगला देशविरुद्धचा सामना पाकला जिंकावा लागणार याचं टेन्शन असताना पाक अभिनेत्रीने एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे अनेकांचा फोकस दूर झाला आहे. तिच्या या ट्विटने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.  (Pakistani actress will get married to a Zimbabwean player, but in return she wants the defeat of India)

अधिक वाचा  : Vivah Muhurat : आज 4 नोव्हेंबरनंतर सुरू होतील मंगल कार्य

कालच्या सामन्यात पावसाने पाकिस्तानवर कृपा दाखवली आणि डकवर्थ लुईस नियमामुळे पाकिस्तानचं काम सोपं झालं. आफ्रिकेला जास्त रनरेट मिळाल्याने सामना जिंकता आला नाही. त्यामुळे पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमध्ये कायम राहिला आहे.अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने झिम्बाब्वेच्या खेळाडूंना खुली ऑफर दिली आहे. भारतविरुद्ध झिम्बाब्वे सामन्याविषयी तिने झिम्बाब्वेच्या खेळाडूंना लग्नाची ऑफर दिली आहे. जर आगामी सामन्यात झिम्बाब्वेने भारताला हरवलं तर मी झिम्बाब्वे मुलासोबत लग्न करेल, असं सेहर शिनवारी म्हणाली.  जर भारत जिंकला तर मी ट्विटर डिलीट करेल, असंही ती म्हणाली आहे. अभिनेत्री सेहर शिनवारी ही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. त्यामुळे नेटकरी तिची खिल्ली उडवतात.

पाहा ट्विट-  

पाकिस्तान सेमीफायनलचं स्वप्न पोहतोय पण ते एवढं सोपं काम असणार नाही. आता पाकिस्तानचे 4 पाँईंट्स आहेत.उपांत्य फेरीतील दुसरा संघ बनण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. असं केल्यास पाकिस्तानाला 6 गुण मिळतील. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सविरुद्धचा शेवटचा सामना हरावा यासाठी पाकिस्तानलाही प्रार्थना करावी लागेल. कारण  दक्षिण आफ्रिकेचे गुण हे  केवळ पाच गुण राहतील आणि पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी