R Ashwin: अश्विनच्या नॉमिनेशनवरून पाकिस्तानात गोंधळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 29, 2021 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC Test Player of The Year: आयसीसीच्या यादीत चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे यात अश्विन, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट, न्यूझीलंडचा वेगवानगोलंदाज काईल जॅमिसन आणि श्रीलंकेच्या दिमुथ करूणारत्नेचा समावेश आहे. 

r ashwin
R Ashwin: अश्विनच्या नॉमिनेशनवरून पाकिस्तानात गोंधळ 
थोडं पण कामाचं
  • आयसीसीच्या या यादीत चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
  • यात टीम इंडियाचा स्टार आर. अश्विन, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जॅमीसन आणि श्रीलंकेचा दिमुथ करूणारत्ने यांचा समावेश आहे
  • आता या चारपैकी एका खेळाडूला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला जाणार आहे.

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल(ICC) ने वर्ष २०२१ च्या होणाऱ्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंची(Player list) यादी जाहीर केली आहे. आयसीसीच्या या यादीत चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. यात टीम इंडियाचा स्टार आर. अश्विन(r ashwin), इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट(joe root), न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जॅमीसन आणि श्रीलंकेचा दिमुथ करूणारत्ने यांचा समावेश आहे. आता या चारपैकी एका खेळाडूला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला जाणार आहे. आयसीसीच्या या घोषणेस पाकिस्तानात गोंधळ निर्माण झाला आहे. तेथील क्रिकेट चाहत्यानी सवाल केला आहे की यात शाहीन शाह आफ्रिदी  आणि हसन अली यांना स्थान का मिळालेले नाही. pakistani cricket fans asks question on nomination of r ashwin

या लिस्टवर पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार साज सादिक यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी लिहिले की आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ दी इयरसाठी ४ खेळाडू नॉमिनेट झाले. आर. अश्विन, काईम जॅमीसन, ज्यो रूट आणि दिमुथ करुणारत्ने. मी हैराण आहे की अश्विननंतर कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीचे या यादीत नाव नाही. 

पाकिस्तानचे आणखी एक क्रीडा पत्रकार अर्शलान सिद्धीकी यांनीही आयसीसीच्या या निवडीवर सवाल केले आहेत. त्यांनी ट्वीट केले की शाहीन शाह आफ्रिदीने २०२१मद्ये शानदार गोलंदाजी केली. कसोटीत ४७ विकेट मिळवल्या. अश्विननंतर या वर्षी दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. मात्र त्यालाही नॉमिनेशनसाठी पात्र ठरवले नाही. या लिस्टमध्ये हसन अलीचे नाव नाही ही तर हैराणजनक गोष्ट आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये १६.०७च्या सरासरीने ४१ विकेट घेतल्या. त्याची सरासरी अश्विन(१६.६७) आणि शाहीन आफ्रिदी(१७.०६)पेक्षाही चांगली आह. 

अन्य खेळाडूंची कामगिरी

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १५ कसोटीत ६ शतकांसह १७०८ धावा केल्यात. एका कॅलेंडर वर्षात १७०० पेक्षा जास्त धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. पहिल्या स्थानावर मोहम्मद युसूफ आणि दुसऱ्या स्थानावर व्हिव्हियन रिचर्ड्स आहेत. 

न्यूझीलंडचा खेळाडू  काईल जॅमीसनची कामगिरीही या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली ाली. त्याने पाच सामन्यांमध्ये २७ विकेट मिळवल्या. तर  १०५ धावाचे योगदानही दिेले. 

श्रीलंकेचा खेळाडू दिमुथ करूणारत्नेसाठी हे वर्ष चांगले राहिले. त्याने सात सामन्यांमध्ये ९०२ धावा केल्या. या दरम्यान त्याने चार शतकही ठोकले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी