मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली(team india former captain virat kohli) सध्या खराब काळातून जात आहे. प्रत्येक सामन्यात तो धावा काढण्यासाठी खूप प्रयत्न करतोय मात्र त्यात तो अयशस्वी होतोय. विराट कोहली अडीच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक(centur in international cricket) आणि गेल्या पाच महिन्यांपासून अर्धशतक(half century) ठोकू शकलेला नाही आहे. अशातच अनेकजण त्याच्यावर टीका करत आहे. (Pakistani cricketer kamran akmal support to virat kohli)
अधिक वाचा -जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट कुणाचा?
याचट पाकिस्तानी संघाचा माजी विकेटकीपर बॅट्समन कामरान अकमलचेही विधान आले आहे. त्याने कोहलीला सपोर्ट करताना त्याच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. कामरानने सांगितले की आजकाल १-२ सामने खेळणारेही कोहलीला सल्ले देत आहे हे पाहून हसू येतं.
कामरान अकमलने paktv.tv शी बोलताना सांगितले, विराट कोहली एकदम वेगळा खेळाडू आहे. प्रत्येकजण त्या फेसमधून जात असतो. काही खेळाडूंची ही फेस कमी वेळात संपते तर काहीजण दीर्घकाळ कठीण काळातून जातात. त्याला फक्त एका मोठ्या खेळीची गरज आहे. कोहलीचा आत्मविश्वास, खेळासाठी त्याचा जुनून हे गुण त्याला सगळ्यांच्या पुढे ठेवतात.
माजी पाकिस्तानी क्रिकेट र कामरानने सांगितले, पाकिस्तानने ५३ कसोटी, १५७ वनडे आणि ५८ टी-२० सामने खेळलात. तो पुढे म्हणाला, तुम्हाला काय वाटते की एक खेळाडू ज्याने ७० शतके ठोकली आहे तो त्या लोकांचे बोलणे ऐकेल जे त्याला बाहेर काढण्याबद्दल बोलत आहेत. ज्यांनी १-२ सामनेच खेळलेत ते आता विराटबद्दल सल्ला देत आहेत. हे पाहून मला हसू येते.
कामरान पुढे म्हणाला, फुटवर्क, बॅट स्विंग, हेड पोझिशन, शोल्डर सगळं काही नीट होतं. एक खेळाडू आपोआप या गोष्टी ठीक करतो. फक्त तुमचे माईंड पॉझिटिव्ह राखणे गरजेचे असते. तुम्ही तुमच्या भूतकाळात जे काही चांगले केलेय त्याचाच विचार करा. अनेक प्रतिक्रिया येतील. तुम्हाला तुमचे ध्यान एकाग्र राखणे गरजेचे आहे. एका खेळाडूला स्वत:च आपला कोच बनावा लागेल.
विराट कोहलीने नुकत्या इंग्लंड दौऱ्यावर तीनही फॉरमॅटमधील सामने खेळले. यात कोहलीने एकमेवक कसोटी ३१(११, २०) धावा केल्या होत्या. यानंतर दोन टी-२० सामन्यात केवळ १२(१, ११) धावा केल्या. विराटने यानंतर वनडे मालिका खेळली यातील दोन सामन्यांत केवळ ३३(१६,१७) धावा केल्या.
अधिक वाचा - 'शरद पवार' स्टाईलनं भरपावसात आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग
कोहलीने गेल्या अडीच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक आणि पाच महिन्यांमध्ये अर्धशतक ठोकलेले नाही. कोहलीने गेले शतक नोव्हेंबर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटीत ठोकले होते. त्यानंतर तो अद्याप शतकाच्या प्रतीक्षेत आहे.