'या' खेळाडूने कानशिलात लगावल्यानंतर मोहम्मद आमिरने स्पॉट फिक्सिंगबद्दल सांगितलं! 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 21:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

माजी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रज्जाक याने खुलासा केला आहे की, मोहम्मद आमिराल तेव्हाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने कानशिलात लगावली होती. त्यानंतर त्याने सत्य काय आहे हे सांगितलं होतं.

Amir_twitter
मोहम्मद आमिरच्या कोणी मारली होती कानशिलात?  |  फोटो सौजन्य: Twitter

कराची: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटर अब्दुल रज्जाकने असा दावा केला आहे की, वनडेचा तत्कालीन कर्णधार शाहिद आफ्रिदीने कानशिलात लगावल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने स्पॉट फिक्सिंग केल्यानं मान्य केलं होतं. तर सलामीवीर सलमान बट हा २०११ च्या इंग्लंड दौऱ्याच्या आधीच अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात सामील होता. पाकिस्तानी क्रिकेटची इमेज खराब करणाऱ्या या घटनेचा उल्लेख अब्दुल रज्जाकने जीएनएन चॅनलशी बोलताना केला. त्याच्या या दाव्याने पाकिस्तानी क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यामुळे याविषयी आता पुन्हा चर्चा देखील सुरु झाली आहे. 

'आफ्रिदीने मला रुमच्या बाहेर जाण्यास सांगितलं पण थोड्या वेळाने. त्यानंतर मी आमिरच्या कानशिलात लगावल्याचं पाहिलं. त्यानंतर आमिरने जे काही खरं होतं ते सांगितलं.' असं रज्जाक यावेळी म्हणाला. दरम्यान, या अष्टपैलू खेळाडून त्यावेळची परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ला जबाबदार धरलं. याबाबत तो पुढे असंही म्हणाला की, 'पीसीबीने आपली कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी ते आयसीसीकडे गेले. पण असं करण्याऐवजी पीसीबी स्वत: तीन खेळाडूंना मायदेशी पाठवायला हवं होतं आणि काही वर्ष किंवा काही महिन्यांसाठी त्यांच्यावर बंदी घालायला हवी होती. पण त्यांनी तसं न केल्याने पीसीबीने जगभरात पाकिस्तानी क्रिकेटची इमेज खराब केली.' 

यावेळी रज्जाकने दावा केला आहे की, इंग्लंड दौऱ्याआधीच्या काही सामन्यांमध्ये सलमान बट हा मुद्दाम बाद होत होता. याबाबत रज्जाक म्हणाला की, 'मी सुरुवातीलाचा आफ्रिदीला सांगितलं होतं की, मला यात काही तरी काळंबेरं दिसतं आहे. पण त्यावेळी आफ्रिदीने मलाच समजावलं होतं की, ही फक्त मला वाटणारी भीती आहे. तसं काहीही नाही. पण मी जेव्हा वेस्टइंडिज मध्ये टी-२० विश्वचषकादरम्यान जेव्हा मी बटसोबत फलंदाजी करत होतो त्याचवेळी मला कळलं होतं की, तो मुद्दामहून वाईट कामगिरी करत आहे.' 

रज्जाक यावेळी असं सांगितलं की, 'मी बटला त्यावेळी सांगितलं होतं की, एक रन घेऊन मला स्ट्राईक द्यायला सांगितलं होतं. पण त्यावेळी त्याने माझं ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं. त्याचं असं वागणं पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. तेव्हाच मला कळलं होतं की, हा मुद्दाम तसं वागतो आहे. त्यानंतर मी थोडसं दटावूनच त्याला सांगितलं होतं की, मला स्ट्राइक दे. त्यानंतर तो दो-तीन चेंडू खेळूनच मला स्ट्राईक देत होता. यामुळे मी बराच झालो आणि दबावाखाली येऊन बाद झालो.' 

दरम्यान, सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ हे फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर २०११ साली आयसीसीने त्यांना पाच वर्षासाठी निलंबित केलं होतं. या तीनही खेळाडूंनी आपली शिक्षा पूर्ण केली. पाच वर्षांचा निलंबनाचा काळ पूर्ण झाल्यानंतर तिघांनीही क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलं. पण सध्या राष्ट्रीय संघात आमिरची निवड झाली असून सध्या तो पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक संघात आहे. तो सध्या मैदानावर कामगिरी देखील चांगली करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'या' खेळाडूने कानशिलात लगावल्यानंतर मोहम्मद आमिरने स्पॉट फिक्सिंगबद्दल सांगितलं!  Description: माजी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रज्जाक याने खुलासा केला आहे की, मोहम्मद आमिराल तेव्हाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने कानशिलात लगावली होती. त्यानंतर त्याने सत्य काय आहे हे सांगितलं होतं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola