Shahid Afridi:वेगात गाडी चालवणे या पाकिस्तानी क्रिकेटरला पडले भारी, पोलिसांनी पकडून केले असे काही...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 29, 2022 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

PAK cricketer: पाकिस्तानच्या एका दिग्गज ऑलराऊंडरला वेगात गाडी चालवणे चांगलेच भारी पडले आहे. नॅशनल हायवे आणि मोटरवे पोलिसांनी या खेळाडूला लाहोरवरून कराचीला जाताना थांबवले. 

shahid afridi
वेगात गाडी चालवणे या पाकिस्तानी क्रिकेटरला पडले भारी 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचा माजी दिग्गज ऑलराऊंडर शाहीद आफ्रिदीला नुकेच पोलिसांनी पकडले होते.
  • यामागचे कारण म्हणजे तो वेगाने गाडी चालवत होता.
  • शाहीद आफ्रिदीवर मोटरवे पोलिसांनी लाहोरवरू कराचीला जाताना वेगाच गाडी चालवण्याच्या आरोपाखाली पकडले.

मुंबई: जगभरातील सर्व दिग्गज क्रिकेटर्स लक्झरी लाईफ जगत असतात. या सर्वांना लक्झरी कार्सचा शौकही असतो. मात्र नुकतेच एका दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटरशी संबधित बातमी समोर आली आहे. या पाकिस्तानी क्रिकेटरला वेगात गाडी चालवणे भारी पडले आणि पोलिसांनीही पकडले. pakistani cricketer shahid afridi fined for speeding car

अधिक वाचा - सत्ता संघर्षात ओवैसींना मोठा झटका, आमदारांचा पक्षाला रामराम

या क्रिकेटरला पोलिसांनी पकडले

पाकिस्तानचा माजी दिग्गज ऑलराऊंडर शाहीद आफ्रिदीला नुकेच पोलिसांनी पकडले होते. यामागचे कारण म्हणजे तो वेगाने गाडी चालवत होता. शाहीद आफ्रिदीवर मोटरवे पोलिसांनी लाहोरवरू कराचीला जाताना वेगाच गाडी चालवण्याच्या आरोपाखाली पकडले. दरम्यान, दंड आणि समज देऊन त्याला सोडण्यात आले. पाकिस्तानी पोलिसांनी आफ्रिदीवर १५०० रूपयांचा दंड ठोठावला. 

दंड दिल्यानंतर केले हे अपील

पकडले गेल्यानंतर शाहीद आफ्रिदीने आपली चूक मान्य केली होती. पोलिसांनीही त्याच्यासोबत फोटो काढले. सोबतच पोलिसांना या कारवाईसाठी शुभेच्छाही दिल्या. आफ्रिदीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही बातमी सांगितली. त्याने रिट्वीट करत पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सोबतच प्रशासनाकडे एक मागणीही केली की हायवेवर कमीत कमी 120kphचा स्पीड असला पाहिजे. 

अधिक वाचा - 67 व्या वर्षींही विक्रम फेम अभिनेता फिट

असे होते करिअर

४२ वर्षीय शाहीद आफ्रिदीने आपल्या शानदार करिअरमध्ये अनेक सिक्स ठोकले. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४७६ सिक्स आहेत. त्याने पाकिस्तानसाठी २७ कसोटी, ३९८ वनडे आणि ९९ टी-२० सामने खेळलेत. त्याच्या नावावर कसोटीत १७१६, वनडेत ८०६४ आणि टी-२०मध्ये १४१६ धावा आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी