Shoaib akhtar: श्वास रोखून ठेवा....येतेय शोएब अख्तरची 'रावळपिंडी एक्सप्रेस'

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 25, 2022 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shoaib Akhtar biopic: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्यावर होत असलेल्या बायोपिकची घोषणा केली आहे. शोएब अख्तरने सांगितलेय की या सिनेमात अनेक गुपित उघड होणार आहेत. 

shaoib akhtar
श्वास रोखून ठेवा....येतेय शोएब अख्तरची 'रावळपिंडी एक्सप्रेस' 
थोडं पण कामाचं
  • शोएब अख्तरच्या बायोपिकचे नाव रावळपिंडी एक्सप्रेस
  • पाकिस्तानी खेळाडूवर पहिल्यांदा परदेशी सिनेमा येत आहे
  • शोएब अख्तरने सांगितले की त्याच्याशी संबंधित अनेक गुपित उघड होणार आहेत. 

मुंबई: पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर(shoaib akhtar biopic) बायोपिक बनत आहे. या बातमीला वेगवान गोलंदाजाने खुद्द सोशल मीडियाच्या(social media) माध्यमातून दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(international cricket) सर्वाधिक वेगाने बॉल फेकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर असलेल्या अख्तरने सोशल मीडिया हँडल्सवर एक मोशन पोस्टर शेअर करत आपल्या बायोपिकची घोषणा केली. ४६ वर्षीय अख्तरच्या बायोपिकचे नाव आहे रावळपिंडी एक्सप्रेस(rawalpindi express). शोएब अख्तरचा जन्म रावळपिंडीमध्ये झाला होता. आपल्या वेगवान गोलंदाजीने लोकांच्या मनात भीती निर्माण करत असल्यामुळे त्याला रावळपिंडी एक्सप्रेस हे नाव ठेवण्यात आले होते. Pakistani cricketer shoaib akhtar rawalpindi express coming soon

अधिक वाचा - पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

शोएब अख्तरने आपल्या बायोपिक मोशनचे पोस्टर शेअर करताना लिहिले की या सुंदर प्रवासाची सुरूवात. आपली कहाणी, आपले जीवन, आपल्या बायोपिकच्या लाँचची घोषणा करतो. रावळपिंडी एक्सप्रेस - रनिंग अगेन्स्ट द ऑड्स. जर तुम्ही विचार करत आहात की तुम्ही सगळं काही जाणता तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही असा प्रवास कराल जो तुम्ही कधी केला नाहीये. क्यूफिल्म प्रॉडक्शनचा इंटरनॅशनल प्रोजेक्ट. पाकिस्तानी खेळाडूवर पहिला विदेशी सिनेमा. 

शोएब अख्तरने शेअर केलेल्या मोशन पोस्टरचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. पाकिस्तानच्या अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत या सिनेमाती आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. या रावळपिंडी एक्सप्रेसच्या मोशन पोस्टरा अनेक लाख व्ह्यूज मिळाले आहेत. शोएब अख्तर या वर्षी सप्टेंबरमध्ये लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. या लीगमध्ये निवृत्त झालेले क्रिकेटर भाग घेतात. 

अधिक वाचा - रजनीकांत यांचा आयकर विभागाकडून सन्मान

शोएब अख्तरचा पाकिस्तानसाठी रेकॉर्ड चांगला राहिला आहे. रावळपिंडी एक्सप्रेसने प्रदिध् असलेल्या शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४४ विकेट मिळवल्यात. त्याने ४६ कसोटीत १७८ विकेट, १६३ वनडेत २४७ विकेट आणि १५ टी-२० सामन्यात १९ विकेट घेतल्या. अख्तरने २०११मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यावेळेस अख्तर आपले यूट्यूब चॅनेल आणि कमेंट्रीमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी