T20 World Cup 2021:भारताच्या पराभवानंतर जोरात नाचला वसीम अक्रम, आफ्रिदीने जखमेवर चोळले मीठ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2021 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND VS NZ:भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर जवळपास सेमीफायनलच्या बाहेर गेला आहे. 

wasim
WC: भारताच्या पराभवानंतर जोरात नाचले पाकिस्तानी क्रिकेटर्स  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाच्या पराभवानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • यात वसीम अक्रम, वकार युनुस, मिसबाह उल हक आणि वहाब रियाज  जोरदार नाचत आहेत.
  • पाकिस्तान स्पोर्ट्स चॅनेलच्या स्टुडिओमध्ये बसून हे लोक गाण्यावर थिरकत आहेत.

दुबई: T20 World Cup 2021 मधील सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची(team india) स्थिती खूपच खराब झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या(pakistan) सामन्यात ९ विकेटनी पराभव झाल्यानंतर रविवारी टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) सामन्यातही ८ विकेटनी पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडविरुद्ध भारताची फलंदाजी फ्लॉप झाली. त्यांना केळ ११० धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने केवळ २ विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या या पराभवासोबत क्रिकेट चाहते चांगलेच नाराज झाले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात मात्र जल्लोष साजरा करण्यात आला. पाकिसानचा माजी कर्णधार वकार युनुस(waquar younus) टीम इंडियाच्या पराभवानंतर चांगलाच थिरकला. तर शाहीद आफ्रिदीनेही टीम इंडियाच्या पराभवानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. pakistani cricketers dance after india lost match against new zealand

टीम इंडियाच्या पराभवानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात वसीम अक्रम, वकार युनुस, मिसबाह उल हक आणि वहाब रियाज  जोरदार नाचत आहेत. पाकिस्तान स्पोर्ट्स चॅनेलच्या स्टुडिओमध्ये बसून हे लोक गाण्यावर थिरकत आहेत. न्यूझीलंडच्या विजयानंतर लगेचच पाकिस्तानी क्रिकेटर्सनी असा जल्लोष केला. 

शाहीद आफ्रिदीने जखमेवर चोळले मीठ

भारताच्या पराभवानंतर शाहिद आफ्रीदीनेही ट्वीट करत इशारा इशाऱ्यामध्ये टीम इंडियाला चिडवले. शाहीद आफ्रिदीने लिगिले टीम इंडिया आताही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते मात्र ज्या पद्धतीने त्यांनी दोन मोठ्या सामन्यांमध्ये जो खेळ दाखवला आहे ते पाहता हा चमत्कारच वाटू शकतो. 

शोएब अख्तरने भारताच्या पराभवानंतर एक व्हिडिओ पोस्टट केला यात त्याने म्हटलेय की टॉस हरताच टीम इंडियाचा पराभव निश्चित होता. तो पुढे म्हणाला, टीम इंडिया खूप खराब खेळली. अजिबात लयीमध्ये नव्हती. ते खूप दबावात दिसत होते. मला असे वाटलेच नाही की दोन टीम्स खेळत आहे. असे वाटत होते की केवळ एकच टीम खेळत आहे.

पाकिस्तानपाठोपाठ याही सामन्यात भारतीय गोलंदाजी (Indian bowling) निष्प्रभ ठरली. चौथ्या षटकात बुमरानं गप्टिलला माघारी धाडलं. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन (Captain Ken Williamson) आणि सलामीच्या डॅरी मिशेलनं (Dary Mitchell) 72 धावांची भागीदारी साकारली. बुमराच्याच गोलंदाजीवर मिशेल 49 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विल्यमसननं डेवॉन कॉनवेच्या साथीने विजय मिळवला. विल्यमसननं नाबाद राहत 33 धावांची खेळी केली. जगात सर्वोकृष्ट ओळखली जाणारी भारतीय टीम सलग दोनदा पराभूत झाली आहे. पराभूत होण्याची ठळक कारणे पाहिल्यास क्रिकेट चाहत्यांना राग अनावर आणणारी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी