कराची : भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने(rishabh pant) सफेद बॉलच्या क्रिकेटमध्ये आपल्या प्रतिभेचा योग्य वापर केला आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वनडे करिअरमधील(one day career) पहिले शतक ठोकले. पंतचे सफेद बॉलच्या क्रिकेटमध्ये हे पुनरागमन मानले जात आहे कारण याआधी छोट्या प्रकारात तो अनेकदा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे. तर कसोटी सामन्यांमध्ये(test cricket) मात्र शतक ठोकतोय. pakistani former skipper reaction on rishabh pant century
अधिक वाचा - पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी प्या लिंबू-मधाचा काढा
पंतच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने ४७ चेंडू राखत पाच विकेटनी विजय मिळवला. अनेक लोकांचे म्हणणे आहे की पंतला अशाच पद्धतीने खेळणे गरजेचे आहे. कारण तो अति आक्रमक होण्याच्या नादात आपली विकेट गमावतो. पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने पंतच्या या शतकानंतर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. लतीफने म्हटले की पंतने धावा केल्यातर आकाश मर्यादा आहे, मात्र असेही दिवस आहेत ज्यावेळेस तो शून्यावर बाद झाला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना लतीफ म्हणाला, त्याचे तर चले तो चांद तक, नही तो शाम तक. आम्ही सगळेच पंतबद्दल जाणतो. तो स्टम्पिंगमध्ये वाचला, जोस बटलरही त्याच श्रेणीत येतो. मात्र मी निश्चितपणे म्हणेन की फलदाजी विशेषकरून वेगवान गोलंदाजांविरोधात शानदार होती. त्याच्या संतुलनमध्ये शॉट लागताना दिसले. ही काही पहिलीच वेळ नाही की आम्ही असे पाहिले. हा इंग्लंड दौरा गेल्या दक्षिण आफ्रिकेविरद्ध मालिकेत ऋषभ पंतचे नाव नेहमी राहील.
लतीफने ऋषभ पंतचे कौतुक करताना म्हटले की तो विकेटकीपरचा ब्रायन लारा म्हटले तसेच स्वीकारले की त्याचा खेळ गोलंदाजीला निराश करणे आहे. जेव्हा पंत आपल्या लयीत असतो तेव्हा तो विरोधी संघाला त्रास देतो. तो पुढे म्हणाला, जेव्हा पंत लवकर बाद होतो तेव्हा त्याच्या फलंदाजीवर सवाल उपस्थित होतात.
अधिक वाचा - इन्स्टाग्राम झाले डाऊन, ट्विटरवर पडला तक्रारींचा पाऊस
लतीफने पुढे म्हटले की यासाठी मी सतत म्हणतो की तो विकेटकीपर्सचा ब्रायन लारा आहे आणि त्याने आज सिद्ध केले आहे. आतापर्यंत त्याची कामगिरी मिळतीजुळती राहिली आहे. कधी त्याने संघासाठी विजयी खेळी केली आहे तर कधी संघाला विजयाच्या स्थितीतून कठीण परिस्थितीत पोहोचवले कारण तो लवकर बाद झाला.