डिकॉकच्या फसवेगिरीमुळे पाकिस्तानच्या फलंदाजाचा बळी; हुकलं द्विशतक, क्रिकेट चाहत्यांची टीका

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या(South Africa- Pakistan) संघात तीन एकदिवशीय (ODI Series ) सामन्यांची मालिका होत.

Pakistani opener batsman fakhar zaman miss two hundred scored
डिकॉकच्या फसवेगिरीमुळे पाकिस्तानच्या फलंदाजाचा बळी  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • डिकॉकच्या कृतीकडे पंचाचं दुर्लक्ष
  • दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात गमावली द्विशतकाची संधी
  • दुसरा एकदिवशीय सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या (South Africa- Pakistan) संघात तीन एकदिवशीय (ODI Series ) सामन्यांची मालिका होत असून जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) झालेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान पराभूत जरी झाला तरी विजयी संघाला खाली मान घालावी लागत आहे. कारण पाकिस्तानची इनिंग चालू असताना शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चीटिंग करुन पाकिस्तानाचा सलामी फलंदाज फखर झमान याचं द्विशतक होऊ दिले नाही. यामुळे सर्व क्रिकेट चाहते दक्षिण आफ्रिकेच्या संघावर नाराज असून टीका करत आहेत. दरम्यान या दक्षिण आफ्रिका संघ १७ धावांनी विजयी झाला.(Pakistani opener batsman fakhar zaman miss two hundred scored )

क्विंटन डिकॉकच्या जाळ्यात अडकला फखर 

पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज फखर झमान लक्ष्य असलेल्या ३४२ धावांचा पाठलाग करताना १९२ धावांवर खेळत होता. त्यावेळी पाकिस्तानला सहा चेंडूत ३१ धावांची गरज होती, हे अशक्य तर नव्हते पण शक्य ही वाटत नव्हते. यादरम्यान फखरला या सामन्यात द्विशतक करण्याची संधी होती, परंतु दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉक याच्या फसवेगिरीमुळे फखर धावबाद झाला. विशेष म्हणजे याकडे पंचांनीही दुर्लक्ष केलं. 

पाकिस्तान संघाचा सलामीवीर फखर जमां मैदानात होता.अंतिम षटकातच्या पहिल्या चेंडूवर फखर दोन धाव घेत होता, ही धाव त्याने सहज पुर्ण केली असती, परंतु क्किंटन डिकॉकने हूल देत फखर जमांला बाद केले. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसीकडून याप्रकारच्या गोष्टींसाठी नियमघालून देण्यात आले आहेत. परंतु कोणाचेच लक्ष याकडे गेले नाही आणि फखर जमांला बाद घोषित करण्यात आले. दरम्यान फखर जमां जेव्हा दुसरी धाव घेणार होता तेव्हा यष्टीरक्षक डिकॉककडे पाहत होता. परंतु डिकॉकने क्षेत्ररक्षकाला इशारा देत  सांगितले की, 'नॉन स्ट्राइक एंडकडे चेंडू फेक'. त्यावेळी फखर जमां आपल्या सहकारी खेळाडूकडे पाहत होता. यादरम्यान एडन मार्क्रमने चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे फेकला. डिकॉकच्या इशाऱ्यांने फखर जमां याला वाटले की चेंडू दुसऱ्या बाजूला फेकला जाईल. यामुळे मागे वळून पाहू लागला. पण मागे पाहताना फखर जमांची पळण्याची गती कमी झाली आणि चेंडू थेट त्याच्या बाजूकडील यष्टींना लागला.

डिकॉकवर टीका 

क्किंटन डिकॉकच्या अशा हूल देण्यामुळे फखर १९३ धावांवर बाद झाला आणि आपल्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात द्विशतक करण्यापासून वंचित राहिला. दरम्यान डिकॉकवर सर्वस्तरातून टीका केली जात आहे. पाकिस्तानचे क्रिकेटर एक्सपर्ट आणि पत्रकार डिकॉकवर सडकून टीका करत आहेत. याशिवाय पंचावरही टीका केली जात आहे. आयसीसीकडून अशा प्रकारच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी नियम घालून देण्यात आले आहेत, शिवाय दंडाचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी