597 विकेट घेणारा पाकिस्तानी पेसर रस्त्याच्याकडे विकतोय चने, व्हिडिओ झाला व्हायरल

pakistani crecketer selling pacer sells Chane on the road : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने रस्त्यावर मस्ती करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हरभरा विकताना दिसत आहे. रियाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Pakistani pacer sells Chane near the road, video goes viral
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज रस्त्यावर विकतोय चने, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • रियाझ जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
  • वहाब रियाझने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
  • व्हिडिओमध्ये वहाब रियाझ रस्त्यावर चने विकताना दिसत आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज वहाब रियाझने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. वास्तविक, या व्हिडिओमध्ये वहाब रियाझ रस्त्यावर चने विकताना दिसत आहे. रियाजच्या या व्हिडिओवर त्याचा माजी साथीदार अहमद शहजादनेही एक मजेशीर कमेंट केली आहे. ३६ वर्षीय रियाझ जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. (Pakistani pacer sells Chane near the road, video goes viral)

‘क्या बनाऊं और कितने का बनाऊं?

वहाब रियाझने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रस्त्यावर चने विकतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रियाझने लिहिले आहे, ”वाला चा-चा” ऑफ द डे! अपने ऑर्डर भेजें ‘क्या बनाऊं और कितने का बनाऊं?’ या खास हातगाडीभोवती थोडा वेळ घालवताना मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून दिली.

वहाब रियाझच्या या व्हिडिओवर कमेंट करताना त्याचा सहकारी खेळाडू अहमद शहजादने लिहिले, ' ‘वहाब अंकल अली भी कुछ चने चाहता है प्लीज.’ त्याचे चाहतेही वहाबच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

वहाब रियाझच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, वेगवान गोलंदाजाने 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 83, एकदिवसीय सामन्यात 120 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 34 बळी आहेत. वहाब रियाझने त्याच्या कारकिर्दीत 1000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन अर्धशतके आहेत.

दोन वर्षांपासून क्रिकेटपासून दूर

पाकिस्तानचा हा वरिष्ठ वेगवान गोलंदाज गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये त्याने शेवटचा ODI आणि T20I खेळला आणि 2018 पासून तो राष्ट्रीय संघासाठी एकही कसोटी सामना खेळला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी