मुंबई: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) या दोनही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. जेव्हा दोन्ही देशांदरम्यानचा सामना रंगतो तेव्हा तो हायवोल्टेज सामना होतो. नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसरा आयसीसी रँकिंगमध्ये(icc ranking) पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. भारतीय संघाने नुकताच कोणताही वनडे सामना खेळलेला नाही. pakistani team surpass team india in icc one day ranking
अधिक वाचा - सुशांत सिंगच्या पुण्यतिथीनिमित्त रियाने लिहला भावनिक मेसेज
मुल्तानमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवल्या बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाने सोमवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीनुसार भारताला मागे टाकले आहे. मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर पाकिस्तानचे १०६ रेटिंग अंक झालेत आणि भारतापेक्षा एका अंकाने पुढे आहे. न्यूझीलंड १२५ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर इंग्लंड १२४ आणि ऑस्ट्रेलिया १०७ रेटिंग गुणांसह आहे.. पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
मालिकेच्या सुरूवातीला पाकिस्तान १०२ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर होता. दरम्यान, भारताकडे रँकिंगमध्ये सुधारणा करण्याची संधी आहे. कारण ते आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिजबरोबर सामने खेळणार आहेत. तर पाकिस्तान आपली पुढील वनडे मालिका ऑगस्टमध्ये खेळणार आहे.
पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत वनडे क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवला. यात झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या २-१ मालिका विजय समावेश आहे. १९९८नंतर पहिल्यांदा जेव्हा ते पाकिस्तानचा दौरा करण्यास आले होते तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्याच अंतराने हरवले होते.
अधिक वाचा - Russia Business : निर्बंध असतूनही रशियाची चांदी, या मार्गाने
बाबर आझमने आपले शानदार नेतृत्व करत सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानी संघाला चांगले स्थान मिळवून दिले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यांतील शतकाहह सलग दोन वेळा तीन वनडे शतक बनवणारा तो पहिला फलंदाज आहे. याआधी त्याने २०१६मध्ये हे यश मिळवले होते.