Gary kirsten । दुबई : टीम इंडियाला 2011 मध्ये विश्वचषक जिंकून देणारे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात. ते संघात मिसबाह-उल-हकची जागा घेऊ शकतात. क्रिस्टनशिवाय ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सायमन कॅटिच आणि पूटर मूर हे पाकिस्तानी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आहेत. (Pakistan's new head coach could be the player to make India world champions former south african cricketer gary kirsten)
T20 विश्वचषक 2021 सुरू होण्यापूर्वी, मिसबाह-उल-हकने पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. मिसबाहने राजीनामा दिल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनीही राजीनामा दिला.
पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कांगारू सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज व्हॅनन फिलँडर हे फलंदाजी आणि गोलंदाजी सल्लागार म्हणून संघाशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीझ राजा परदेशी खेळाडूला संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या बाजूने असल्याचे वृत्त येत आहे.
पाकिस्तानचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिस्टन 2008 ते 2011 या काळात भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होते. त्याच्या देखरेखीखाली टीम इंडिया तीन दशकांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनली, त्यासोबतच कसोटी क्रिकेटमध्येही जगातील नंबर वन संघ बनला.
क्रिस्टनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही उत्कृष्ट राहिली आहे. त्यांनी त्यांनी आफ्रिकेसाठी 101 कसोटी आणि 185 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7289 धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6798 धावा केल्या. भारतीय संघाला विश्वविजेता बनवल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकही होते, मात्र या काळात ते संघाला कोणतेही मोठे यश मिळवून देऊ शकले नाहीत.