Commonwealth Games 2022 : एकाने पकडली जर्सी, दुसऱ्याने धरला गळा! हॉकी सामन्यात रंगली कुस्ती, पाहा VIDEO

हॉकीचा सामना सुरू असताना दोन खेळाडू एकमेकांना भिडले आणि जणू फ्री स्टाईल कुस्तीच रंगली.

Commonwealth Games 2022
एकाने पकडली जर्सी, दुसऱ्याने धरला गळा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हॉकी सामन्यादरम्यान रंगली कुस्ती
  • पनेसर आणि ग्रिफिथ्स भिडले
  • पनेसरला रेड कार्ड

Commonwealth Games 2022 : सध्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Bermingham Commonwealth Games 2022) रंगत यायला सुरुवात झाली असून पहिल्या आठवडा संपला आहे. दुसऱ्या आठवड्यात अनेक महत्त्वपूर्ण खेळांच्या स्पर्धा (Competitions) पार पडणार आहेत. हॉकीचे सामनेही सध्या सुरू आहेत आणि फायनलच्या दिशेने या सामन्यांचा प्रवास सुरू आहे. हॉकीमधील (Hockey) सेमीफायनलचे सामने आता निश्चित झाले आहेत. कुस्तीचे सामने अजून सुरू झालेले नाहीत. मात्र एका हॉकीच्या सामन्यातच दोन खेळाडूंमधील कुस्ती प्रेक्षकांना पाहता आली. एका हॉकीच्या सामन्यात दोन खेळाडू एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली. एकाने दुसऱ्याची जर्सी पकडली तर दुसऱ्याने पहिल्याचा थेट गळाच पकडला.

इंग्लंड विरुद्ध कॅनडा

गुरुवारी इंग्लंड विरुद्ध कॅनडा असा हॉकी सामना होता. पुरुष गटातील या हॉकी सामन्यात खेळणारा लंडन संघ अगोदरच सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. मात्र तरीही जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ हा सामना खेळत होतेे. कॅनडाचा संघ अगोदरच या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्यासाठी हा अखेरचा सामना म्हणजे केवळ औपचारिकता होती. या सामन्यात पहिल्यापासून इंग्लंडचं पारडंच जड होतं. इंग्लंडचा संघ इतक्या जोमाने खेळत होता की पहिल्या हाफमध्येच त्यांनी कॅनडावर 4-1 नं आघाडी घेतली होती. पहिल्या हाफमध्ये सातत्याने इंग्लंड वरचढ ठरत असल्याचं पाहून कॅनडाचे खेळाडू आपलं सगळं कौशल्य पणाला लावून खेळत होते. याच दरम्यान दोन्ही संघाच्या दोन खेळाडूंमध्ये भांडण झालं. 

सुरु झाली हाणामारी

इंग्लंडचे खेळाडू सतत गोल करण्याच्या तयारीत पुढे सरसावत होते. तर कॅनडाचे खेळाडू सर्व शक्तीनिशी डिफेन्सची बाजू सांभाळत होते. कॅनडाच्या गोल सर्कलपाशी अचानक दोन खेळाडूंमध्ये भांडणं सुरू झाली. इंग्लंडचा ख्रिस्तोफर ग्रिफिथ्स आणि कॅनडाचा बलराज पनेसर आमनेसामने आले. ग्रिफिथ्स हा बॉलमागे पळण्यासाठी वळत असतानाच पनेसरने त्याला रोखण्यासाठी हॉकी स्टिक पुढे केली. ही स्टिक अगदी ग्रिफिथ्सच्या पोटापाशी आली. मग ग्रिफिथ्सनं ही स्टिक आपल्या हाताने पकडली आणि त्यामुळे पनेसर भडकला.

दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडू लागले. ग्रिफिथ्सने पनेसरची जर्सी पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पनेसरने ग्रिफिथ्सचा गळा पडकला. दोघंही एकमेकांना ढकलू लागले आणि खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर काही क्षणांत दोन्ही संघाचे खेळाडू तिथे पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही एकमेकांपासून लांब नेलं. 

अधिक वाचा - CWG 2022: मेडल मिळाल्यानंतर भारताचा हा खेळाडू मैदानातच रडू लागला...

पनेसरवर कारवाई

या प्रकारानंतर रेफरीनं पनेसरला रेड कार्ड दाखवत मॅचमधून बाहेर काढलं. तर ग्रिफिथ्सला यलो कार्ड दाखवलं. खरं तर अगोदर ग्रिफिथ्सनं पनेसरची जर्सी पकडली होती. मात्र पनेसरनं थेट गळा पकडल्यामुळेच त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दुसऱ्या हाफमध्येही इंग्लंडनं आपली जोरदार कामगिरी सुरू ठेवली आणि कॅनडावर 11-2 असा विजय मिळवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी