T20 World Cup:पंत की कार्तिक? बांगलादेशविरुद्ध कोण खेळणार? द्रविडच्या उत्तराने सारे हैराण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2022 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahul Dravid: पत्रकार परिषदेत कोच राहुल द्रविडला विचारण्यात आले की उद्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिक खेळणार की ऋषभ पंत. यावरील आपल्या उत्तराने त्याने प्रत्येकाला हैराण केले. 

team india
T20 World Cup:पंत की कार्तिक? बांगलादेशविरुद्ध कोण खेळणार?  
थोडं पण कामाचं
  • बांगलादेशविरुद्ध बुधवारी खेळवल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2022च्या सामन्याआधी टीम इंडियाचे हेड कोट राहुल द्रविडने आज मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.
  • भारत सध्या ग्रुप 2च्या पॉईंट्स टेबलमध्ये 3 सामन्यांमध्ये 2 विजय आणि एका पराभवासह 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • बांगलादेशवरुद्ध विजयाने भारताचे 6 अंक होतील आणि ते सेमीफायनलमध्ये त्यांचे स्थान पक्के होईल. 

मुंबई: भारत(india) आणि बांगलादेश(bangladesh) यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2022()मधील सामना उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी 1:30 वाजता अॅडलेडच्या द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. भारत सध्या ग्रुप 2च्या पॉईंट्स टेबलमध्ये 3 सामन्यांमध्ये 2 विजय आणि एका पराभवासह 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशवरुद्ध विजयाने भारताचे 6 अंक होतील आणि ते सेमीफायनलमध्ये त्यांचे स्थान पक्के होईल. pant or karthik who will play against bangladesh says rahul dravid

अधिक वाचा - मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राहुल गेठे यांना धमकी

पंत की कार्तिक कोण खेळणार सामना?

बांगलादेशविरुद्ध बुधवारी खेळवल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2022च्या सामन्याआधी टीम इंडियाचे हेड कोट राहुल द्रविडने आज मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोच राहुल द्रविडला विचारण्यात आले की उद्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिक खेळणार की ऋषभ पंत. यावरील द्रविडने दिलेल्या उत्तराने सारेच हैराण झाले. 

कोच द्रविडच्या उत्तराने सारेच हैराण

टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने म्हटले आहे की अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचा फिटने पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल की त्याला बांगलादेशविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2022  सामना खेळायचा की नाही. द. आफ्रिकेविरुद्ध रविवारी सामन्यात भारताला पाच विकेटनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान कार्तिकच्या पाठीला दुखापतीमुळे सामना मध्येच सोडावा लागला होता. 

बांगलादेशविरुद्ध खेळणार की नाही?

द. आफ्रिकेविरुद्धच्या उरलेल्या ओव्हरमध्ये ऋषभ पतने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली होती. यामुळे कार्तिक बुधवारच्या सामन्यात खेळणार की नाहीयाबाबत संशय व्यक्त केला जात होता. द्रविड म्हणाला, दुर्देवाने कार्तिकने एक बाऊन्सर पकडण्यासाठी हवेत उडी घेतली मात्र तो खाली जमिनीवर चुकीच्या पद्धतीने पडला आणि यामुळे त्याच्या पाठीला समस्या निर्माण झाली.

अधिक वाचा - आजपासून मुंबईत चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट सक्ती

काही उपचारानंतर कार्तिक आज चांगल्या पद्धतीने कीपिंग करताना दिसत आहे. तो ट्रेनिंगसाठी आला आहे आणि आमचे त्याच्यावर लक्ष आहे. आज सराव सत्रानंतर आम्ही उद्या पाहू की त्याचा फिटनेस कसा आहे ते. त्याचा फिटनेस पाहिल्यानंतर शेवटचा निर्णय घेतला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी