भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) युवा क्रिकेटपटू (young cricketers) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि ईशान किशनने (Ishaan Kishan) आपल्या फटाकेबाज फलंदाजीने (batting) लोकांची मने जिंकून घेतली आहेत. या दोघांनी इंग्लंडविरोधातल्या (England) मालिकेत (series) उत्तम प्रदर्शन (great performance) केले. पृथ्वी शॉने तो मोठ्या शर्यतीचा घोडा असल्याचे सिद्ध केले. क्रिकेटइतकेच रंजक या खेळाडूंचे खासगी आयुष्यही (private life) आहे. रिषभ पंतची गर्लफ्रेंड (girlfriend) इंटीरियर डिझायनर (interior designer) आहे तर ईशान किशन एका मॉडेलला (model) डेट (date) करत आहे. पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) गर्लफ्रेंड अभिनेत्री (actress) आहे.
हाती आलेल्या बातम्यांनुसार रिषभ पंतप्रमाणेच त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी उत्तराखंडची आहे. तिने आपले शालेय शिक्षण डेहराडूनच्या कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी शाळेत पूर्ण केले आणि नोयडाच्या अॅमिटी विद्यापीठातून इंग्रजी ऑनर्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ईशा दिसायला खूप ग्लॅमरस आहे. ईशा ही उद्योजिका आणि इंटीरियर डेकोरेटर आहे. ती सोशल मीडियावरही खूपच सक्रीय असते.
ईशान किशनच्या कथित गर्लफ्रेंड असलेल्या अदिती हुंडियाचा जन्म 15 जानेवारी 1997 रोजी राजस्थानातील जयपूर इथे झाला होता. अदितीला आपले करियर मॉडेलिंगमध्ये घडवायचे होते. तिने 2016मध्ये या क्षेत्रात पाऊल ठेवले. अदितीने एलीट मिस राजस्थान स्पर्धेत भाग घेतला होता. यात ती उपविजेती ठरली होती. यानंतर तिने 2017मध्ये फेमिना मिस इंडिया राजस्थानच्या पुरस्कारावर नाव कोरले. त्याच वर्षी एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया 2017मध्ये ती टॉप 15 स्पर्धकांमध्ये होती. 2018मध्ये तिने मिस सुपरनॅच्युरल हा किताब जिंकला होता.
पृथ्वी शॉबद्दल म्हटले जात आहे की हा भारतीय सलामीवीर सध्या प्राची सिंह या टीव्ही अभिनेत्रीला डेट करत आहे. माध्यमांच्या बातम्यांनुसार पृथ्वी आणि प्राची चांगले मित्र आहेत. प्राची ही अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तिने कलर्स वाहिनीच्या उडान या प्रसिद्ध मालिकेत काम केले आहे. ती एक मॉडेलही आहे. आपल्या बेली डान्सिंगसाठी ती प्रसिद्ध आहे.