सायना नेहवालवरील अभिनेत्याच्या विधानाने भडकला पी कश्यप, महिला आयोगापर्यंत पोहोचले प्रकरण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 11, 2022 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

p kashyap on siddharth: सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखल्याप्रकरणावर एक ट्वीट केले होते. यावर उत्तर म्हणून सिद्धार्थने ट्वीट रत सायनावर टीका केली तसेच तिला Subtle Cock असेही म्हटले.

saina- p kashyap
सायना नेहवालवरील अभिनेत्याच्या विधानाने भडकला पी कश्यप 
थोडं पण कामाचं
  • सायना नेहवालवर केली टिप्पणी
  • अभिनेता सिद्धार्थवर भडकला पी कश्यप
  • सायना नेहवाल भारताची माजी नंबर वन खेळाडू

मुंबई: भारताची माजी नंबर वन बॅडमिंटन खेळाडू आणि ऑलिम्पिक मेडलिस्ट सायना नेहवालवर(saina nehwal) दाक्षिणात्य सिने अभिनेता सिद्धार्थने(actor siddharth) विधान केल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. सायना नेहवालचा पती आणि बॅडमिंटन खेळाडू पारुपल्ली कश्यपने(p kashyap) ट्वीटच्या माध्यमातून सिद्धार्थच्या या विधानावर टीका केली आहे तसेच सिद्धार्थने टीका करण्यापूर्वी आपण काय शब्द वापरत आहोत हे पाहावे असेही म्हटले आहे. 

सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखल्याप्रकरणावर एक ट्वीट केले होते. यावर उत्तर म्हणून सिद्धार्थने ट्वीट रत सायनावर टीका केली तसेच तिला Subtle Cock असेही म्हटले. इतकंच नव्हे तर सिद्धार्थने आपल्या ट्वीटच्या समर्थनार्थ आणखी एक ट्वीट केले करत स्पष्टीकरणाचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण घटनाक्रमात कश्यपच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर सिद्धार्थवर टीका केली जात आहे. आता हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. 

काय आहे पूर्ण प्रकरण

५ जानेवारी २०२१ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रॅलीसाठी पंजाबच्या बठिंडा येथे पोहोचले. रस्त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांचा ताफा एका फ्लायओव्हरवर २० मिनिटे थांबवा बोता. साधारणपणे पंतप्रधानांचा ताफा अशा कोणत्याही यात्रेदरम्यान आधीच सुरक्षा व्यवस्था करून हटवला जातो. मात्र या घटनेनंतर अनेक लोकांनी देशाच्या पंतप्रधाांचा ताफा रोखल्यावरून राज्य सरकारव सवाल उपस्थित केले. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनानेबी या प्रकरणी पंतप्रधानांच्या सुरक्षेची चिंता करत ६ जानेवारीला ट्वीट केले होते. सायनाचा पक्ष पाहता दाक्षिणात्या अभिनेता सिद्धार्थने त्याच्यावर कटाक्ष करताना ट्वीट केले.

सिद्धार्थच्या ट्वीटनंतर सायनाचे पती बॅडमिंटन खेळाडू पी कश्यपने त्याने वापर केलेल्या शब्दांची निंदा करत ट्वीट केले. साधारणपणे शांतपणे प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कश्यपला यावेळी अनेकांनी पाठिंबा दिला. दरम्यान, यावरून आता राजकारण सुरू झाले आहे.राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना चिठ्ठी लिहत सिद्धार्थचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी