Top Tweets 2021: पॅट कमिन्सला मिळाला गोल्डन ट्वीटचा खिताब, या ट्वीटला मिळाले सगळ्यात जास्त लाईक्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 09, 2021 | 20:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Golden tweet award: विराट कोहलीने आपल्या मुलीच्या जन्माबद्दल ट्वीट केले होते जे भारतासह अनेक देशांमध्ये पसंत केले आहे. कोहलीचे हे ट्वीट २०२१मध्ये सर्वाधिक पसंत करण्यात आले

twitter
कमिन्सला गोल्डन ट्वीटचा खिताब,या ट्वीटला मिळाले जास्त लाईक्स 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियन क्रिकेटर पॅट कमिन्सने केलेले ट्वीट गोल्डन ट्वीट ठरले.
  • भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पॅट कमिन्सने भारतात कोविड रुग्णांसाठी दान केले होते
  • कमिन्सचे हे ट्वीट २०२१मध्ये भारतात सर्वाधिक रिट्वीट करण्यात आले.

मुंबई: गुगल(google) आणि अॅपलनंतर(apple) आता मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने(twitter) २०२१मध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर होणारे ट्वीट(tweet), त्याला मिळणारे लाईक आणि कमेंट्सची लिस्ट जाहीर केली आहे. ट्विटर इंडियाने(twitter india) ते ट्रेंड्स, हॅशटॅग आणि ट्वीटची लिस्ट जाहीर केली आहे. जे या २०२१ या वर्षात ट्विटरवर दबदबा राहिला. pat cummins got golden tweet reward, this tweet got many likes

२०२१मधील गोल्डन ट्वीट

सर्वाधिक रिट्वीट होणारे ट्वीट- भारतात कोविड १९साठीच्या आपल्या देणगीबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर पॅट कमिन्सने केलेले ट्वीट गोल्डन ट्वीट ठरले. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पॅट कमिन्सने भारतात कोविड रुग्णांसाठी दान केले होते तसेच इतरांनाही असे करण्याचे आवाहन केले होते. कमिन्सचे हे ट्वीट २०२१मध्ये भारतात सर्वाधिक रिट्वीट करण्यात आले. हे या वर्षातील सर्वाधिक कोट करण्यात आलेले ट्वीटही होते. 

सर्वाधिक पसंती मिळवलेले ट्वीट्स

या वर्षाच्या सुरूवातीला विराट कोहलीने आपल्या जन्माबाबत एक ट्वीट केले होते जे भारतासह अनेक देशांमध्ये पसंत केले गेले. कोहलीचे हे ट्वीट २०२१मध्ये सर्वाधिक पसंत करण्यात आलेले ट्वीट बनले आहे. गेल्या वर्षी विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीबाबत ट्वीट केले होते हे ट्वीट २०२०मध्ये सर्वाधिक पसंत करण्यात आले होते. 

सरकारमधील टॉप ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या लसीबाबत पहिल्या डोसबाबत आपला फोटो ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो वर्षातील सर्वाधिक रिट्वीट करणारा ट्वीट बनले. या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींनी डॉक्टर्स, शास्त्रज्ञ आणि आरोग्यकर्मचाऱ्यांना त्यांच्या लढाईसाठी आभार व्यक्त केले होते. 

बिझनेसमधील टॉप ट्वीट

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा ग्रुपने एअर इंडिया ७० वर्षांनी परत ताब्यातघेतली. यावर आनंद व्यक्त करताना रतन टाटा यांनी ट्वीट केले होते. रतन टाटा यांचे हे ट्वीट बिझनेसमधील सर्वाधिक रिट्वीट केले जाणारे ट्वीट ठरले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी