IND vs AUS 4th Test : ...म्हणून अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम काळ्या पट्ट्या लावून मैदानात

Pat Cummins mother died Asutralia Team play with black arm bands in India vs Australia Ahmedabad Test  : अहमदाबादमध्ये चौथ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम काळ्या पट्ट्या लावून मैदानात आली.

Pat Cummins mother died
अहमदाबाद टेस्ट, ऑस्ट्रेलिया काळ्या पट्ट्या लावून मैदानात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अहमदाबाद टेस्ट, ऑस्ट्रेलिया काळ्या पट्ट्या लावून मैदानात
  • पॅट कमिन्सची आई मारिया यांचे निधन
  • शोक प्रकट करण्यासाठी ऑस्ट्रेलिया काळ्या पट्ट्या लावून मैदानात

Pat Cummins mother died Asutralia Team play with black arm bands in India vs Australia Ahmedabad Test  : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजची चौथी आणि निर्णायक टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये सुरू आहे. आज मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम काळ्या पट्ट्या लावून मैदानात आली. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्स याच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले. हे वृत्त कळताच शोक प्रकट करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी मॅचच्या दुसऱ्या दिवशी दंडाला काळ्या पट्ट्या (ब्लॅक आर्म बँड) लावून खेळण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करून या निर्णयाची माहिती दिली.

अहमदाबाद टेस्टचे स्कोअरकार्ड

पॅट कमिन्सची आई मारिया यांना कॅन्सर झाला होता. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. याच कारणामुळे मागील दोन टेस्टमध्ये पॅट कमिन्स खेळला नाही. तो आईला भेटण्यासाठी तसेच तिची काळजी घेण्यासाठी मायदेशी रवाना झाला होता. उपचार सुरू असतानाच पॅट कमिन्सची आई मारिया यांचे निधन झाले. यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अहमदाबाद टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू दंडाला काळ्या पट्ट्या (ब्लॅक आर्म बँड) लावून खेळतील आणि शोक प्रकट करतील असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करून जाहीर केले.

जाहीर केल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दंडाला काळ्या पट्ट्या (ब्लॅक आर्म बँड) लावून मैदानात आले.

ऑस्ट्रेलियाने 300 धावांचा टप्पा ओलांडला

अहमदाबाद टेस्टमध्ये टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने 111 ओव्हरमध्ये 4 बाद 306 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ट्रॅव्हिस हेड 32 धावा करून अश्विनच्या चेंडूवर रवींद्र जडेजाकडे झेल देऊन परतला. मार्नस लब्युशेन 3 धावा करून मोहम्मद शमीच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. कॅप्टन असलेला स्टीव्हन स्मिथ 38 धावा करून रवींद्र जडेजाच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. पीटर हँड्सकोम्ब 17 धावा करून मोहम्मद शमीच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. शतकवीर उस्मान ख्वाजा आणि अर्धशतकवीर कॅमेरॉन ग्रीन खेळत आहेत.

Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

लांबसडक सुंदर केसांसाठी खा हे पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी