SL vs AUS: पथुम निसांकाने वनडेमध्ये पहिल्यांदाच झळकावले शतक; श्रीलंका ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रचणार इतिहास? 

Sri Lanka vs Australia | सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयाने मालितकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Pathum Nissanka scored his first ODI century, sri lanka won the 3rd match against australia 
श्रीलंका ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रचणार इतिहास?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.
  • श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयाने मालितकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
  • श्रीलंका ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रचणार इतिहास? 

Sri Lanka beat Australia by 6 wickets in 3rd Odi | कोलंबो : सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयाने मालितकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे श्रीलंका ३० वर्षांनंचर ऑस्ट्रेलियाविरूद्ध इतिहास रचणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पथुम निसांकाच्या शानदार शतकामुळे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना ६ गडी राखून जिंकला. श्रीलंकेने दुसरा सामना २६ धावांनी जिंकला होता, तर पहिल्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून २ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. (Pathum Nissanka scored his first ODI century, sri lanka won the 3rd match against australia). 

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी करा ही ५ योगासने, लगेच मिळेल आराम

श्रीलंका रचणार इतिहास? 

दरम्यान, तिसर्‍या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच मालिकेतील चौथा सामना २१ जून २०२२ रोजी म्हणजेच आज कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. श्रीलंकेने चौथा एकदिवसीय सामना जिंकला तर तब्बल २० वर्षांनंतर आपल्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्यात लंकेला यश मिळेल. श्रीलंकेने अखेरची एकदिवसीय मालिका ऑगस्ट १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जिंकली होती. तेव्हा त्यांनी त्यांनी ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली होती. 

तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा बोलबाला

तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ६ बाद २९१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ४८.३ षटकात ४ गडी गमावत २९२ धावा केल्या आणि सामना जिंकला. श्रीलंकेसाठी पथुम निसांकाने १४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची शतकीय खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे त्याने एकदिवसीय कारकिर्दीत पहिलेच शतक झळकावले आहे. 

त्याच्याशिवाय कुसल मेंडिसने ८५ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. सलामीवीर निरोशन डिकवेला वैयक्तिक २५ धावांवर ग्लेन मॅक्सवेलने माघारी पाठवले. धनंजय डी सिल्वानेही २५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने ३९ धावा देऊन २ बळी पटकावले. जोश हेझलवूड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी