मुंबई: T20 Blast 2022 स्पर्धेला सुरूवात झाली आहे. नॉर्थ ग्रुपमधील वॉरविकशायर आणि नॉर्थम्पटनशायर (Warwickshire vs Northamptonshire) यांच्यातील सामन्यादरम्यान जबरदस्त फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. वॉरविकशायरकडून खेळताना आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंगने(paul sterling) तुफानी अंदाजात फलंदाजी केली. त्याने ५१ बॉलमध्ये ११९ धावा केल्या. यात त्याने १० सिक्स आणि ९ चौकार ठोकले. पॉलने ४६ बॉलमध्ये शतक ठोकले. आपल्या डावादरम्यान आयर्लंडच्या या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये ३४ धावा केल्या यात त्याने ५ सिक्स आणि एक चौकार ठोकला. paul sterling hits 96 runs in 19 ball in T20 Blast 2022
अधिक वाचा - ड्रग केसमध्ये एनसीबीकडून आर्यन खानला क्लीनचीट
नॉर्थम्पटनशायरचा गोलंदाज जेम्स सेल्सविरुद्ध स्टर्लिंगने धमाल केली आणि सलग ५ बॉलवर ५ सिक्स ठोकले. असे वाटत होते की ६ बॉलवर ६ सिक्स मारत आपला रेकॉर्ड पूर्ण करेल. मात्र सेल्स नशीबवान होता की त्याच्या शेवटच्या बॉलवर चौकार बसला. मात्र या ओव्हरमध्ये ३४ धावा करत स्टर्लिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
स्टर्लिंगचे टी-२०मधील हे तिसरे शतक आहे. स्टर्लिंगचे टी-२० ब्लास्टमध्ये हे पदार्पण आहे आणि आपल्या पदार्पणाच्या हंगामात आयर्लंडच्या या फलंदाजाने धूम-धडाक्याने फलंदाजी करत सोशल मीडियावर कौतुक करवून घेतले. सगळीकडे आता त्याचे कौतुक सुरू आहे.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣4️⃣ - 34 from an over!@stirlo90 is a cheat code 😲 #Blast22 pic.twitter.com/Sy7ByS4wwm — Vitality Blast (@VitalityBlast) May 26, 2022
अधिक वाचा - केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर लिलावतीमध्ये अँजिओप्लास्टी
आपल्या ११९ धावाच्या खेळीदरम्यान पॉल स्टर्लिंगने ९६ धावा केवळ चौकार आणि षटकारांनी बनवल्या. आपल्या डावात त्याने १० सिक्स आणि ९ फोर ठोकले. म्हणजेच १९ बॉलमध्ये त्याने ९६ धावा ठोकल्या. पॉल स्टर्लिंगच्या धुंवाधाक ११९ खेळीच्या जोरावर वॉरविकशायरने १६ ओव्हरमध्ये ३ बाद २०७ धावा केल्या. त्यानंतर नॉर्थम्पटनशायरने १४.२ ओव्हरमध्ये ८१ धावा करत ऑलआऊट झाली. पावसाने गोंधळ घातलेल्या या सामन्यात वॉरविकशायरने १२५ धावांनी विजय मिळवला.