sania mirza: सानिया मिर्झावर खटला दाखल करण्याची होतेय मागणी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2021 | 17:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shoaib malik: शेवटच्या २ ओव्हरमध्ये शोएबची कामगिरी जबरदस्त होती. त्याने शेवटच्या २ ओव्हरमध्ये ८ बॉल खेळले आणि ३७ धावा केल्या. त्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला २०ओव्हरमध्ये ४ बाद १८९ धावा करता आल्या.

sania shoaib
sania mirza: सानिया मिर्झावर खटला दाखल करण्याची होतेय मागणी 
थोडं पण कामाचं
  • शेवटच्या २ ओव्हरमध्ये शोएबची कामगिरी जबरदस्त होती.
  • त्याने शेवटच्या २ ओव्हरमधील ८ बॉल खेळले आणि ३७ धावा केल्या.
  • या तुफानी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये ४ बाद १८९ धावा केल्या.

दुबई: पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने(pakistani cricketer shaoaib malik) शारजाहमध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून(pakistan) सर्वाधिक जलद अर्धशतक(fastest fifty) ठोकत नवा विक्रम प्रस्थापित केला. शोएब मलिकच्या या शानदार खेळीदरम्यान त्याची पत्नी आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा(sania mirza) आणि मुलगा इजहान मिर्झा मलिकसोबत स्टेडियममध्ये उपस्थित होती. सामन्यादरम्यान सानिया आणि इजहान यांनी शोएब मलिकला चांगला पाठिंबा दिला. 

पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शोएब मलिक जेव्हा फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा पाकिस्तानचा स्कोर १५ ओव्हरमध्ये ३ बाद ११२ इतका होता. यानंतर पाकिस्तानी ऑलराऊंडरने केवळ १८ चेंडूत अर्धशतक ठोकत वेगवान ५० धावा करण्याचा विक्रम केला. त्याने पाकिस्तानी महिला क्रिकेटर निदा डारचा मागचा रेकॉर्ड तोडला. निदा डारने २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानकडून २० बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते. 

शेवटच्या २ ओव्हरमध्ये शोएबची कामगिरी जबरदस्त होती. त्याने शेवटच्या २ ओव्हरमधील ८ बॉल खेळले आणि ३७ धावा केल्या. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये ४ बाद १८९ धावा केल्या. शोएब १८ चेंडूत ५४ धावांवर नाबाद राहिला. जेवढ्या वेळेस शोएबने षटकार ठोकले तेव्हा तेव्हा मुलगा इजहान मिर्झा मलिकसह पत्नी सानिया मिर्झा त्याचा विश्वास वाढवताना दिसली. सानिया शोएबला चीअर करत असल्याचे स्क्रीनशॉट ट्विटरवर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया युजर्सने स्टार क्रिकेटरच्या पत्नीला त्याचा लकी चार्म होण्याचे श्रेय दिले आहे. Petition to have Sania Mirza in each match when Pakistan is playing


@Iam_Mianने ट्विटरवर लिहिले, सानिया मिर्झा नेहमीप्रमाणेच शोएब मलिकसाठी लकी चार्म राहिली आहे. कारण जेव्हा ती त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात येते तेव्हा तो जबरदस्त कामगिरी करतो.

@Ayemanmalik01ने लिहिले की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाईचा सहभाग असतो.


@TWrites11 ने लिहिले, सानिया मिर्झा सेमीफायनलमध्ये पोहोचणारी एकमेव व्यक्ती आहे.

@Mahii_taekook07 ने म्हटले की, आम्ही या मागणीसह याचिका दाखल करतो की जेव्हा पाकिस्तान खेळत असेल तेव्हा सानिया मिर्झा त्या सामन्यात जरूर असावी. 

@DareliAhmadने लिहिले, केवळ १८ बॉलमध्ये ५४, ३०० चा स्ट्राईक रेट. पाकिस्तानसाठी सगळ्यात वेगवान टी-२० अर्धशतक. धन्यवाद सानिया मिर्झा .

शोएब मलिकच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास पाकिस्तानकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा पहिला पाकिस्तानी क्रिकेटर बनला आहे. त्याने ुरुषांमध्ये उमर अकमलचा रेकॉर्ड तोडला. अकमलने २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅझबेस्टनमध्ये २१ आणि २०१६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे २२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी