धोनीच्या शानदार फार्महाऊसची सफर PHOTOतून

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 02, 2021 | 15:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

रांचीच्या कैलाशपती येथे असलेले हे धोनीचे फार्महाऊस खूपच शानदार आहे. धोनी येथे आपला बराच वेळ पत्नी साक्षी आणि झिवासोबत घालवत असतो.

UP minister threatened on Phone call
धोनीच्या शानदार फार्महाऊसची सफर PHOTOतून 

थोडं पण कामाचं

  • रांचीच्या कैलाशपती येथे धोनीचे हे फार्महाऊस आहे. 
  • धोनी बराच वेळ आपली पत्नी आणि मुलगी झिवा हिच्यासोबत या फार्महाऊसवर घालवत असो. 
  • धोनीच्या या फार्महाऊसवर त्याच्या सुपरबाईक्सचे कलेक्शन आहे. 

मुंबई: महेंद्रसिंग धोनी(mahendrasingh dhoni). भारतीय क्रिकेट जगतातील एक मोठे नाव. ज्याला क्रिकेट हा खेळ आवडतो त्याला धोनी हे नाव माहीत नसणं केवळ अशक्यच. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती जरी घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याचा जलवा अद्याप कायम आहे. तो एकमेव कॅप्टन आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत.(Photo Tour of MS Dhoni farmhouse which is located in ranchi) 

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व तो करत आहे. १४व्या हंगामातील काही सामने कोरोनामुळे स्थगित करण्यात आले. त्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. तो आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हिच्यासह रांचीच्या आपल्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. 

धोनीचे हे फार्महाऊस केवळ घर नाही तर एक जबरदस्त शानदार घर आहे. धोनीचे हे फार्महाऊस ७ एकरवर पसरले आहे. धोनीची पत्नी साक्षी नेहमी याचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड करत असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

इतकंच नव्हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की धोनीला बाईक तसेच गाड्यांची किती आवड आहे ते. धोनीचे हे फार्महाऊस म्हणजे त्याच्या सुपरबाईक्स आणि लक्झरियस कारचे कलेक्शन आहे. तसेच धोनीने पाळलेल्या प्राण्यांसाठीही ही परफेक्ट जागा आहे. 

पाहा याचे काही फोटोज...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी