PKL : लवकरच सुरू होणार महिला प्रो कबड्डी लीग

plan to start womens pro kabaddi league like womens ipl : महिलांच्या आयपीएल (Indian Premier League : IPL) प्रमाणे लवकरच महिलांची प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League : PKL) सुरू होणार आहे.

plan to start womens pro kabaddi league like womens ipl
PKL : लवकरच सुरू होणार महिला प्रो कबड्डी लीग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • PKL : लवकरच सुरू होणार महिला प्रो कबड्डी लीग
  • महिलांच्या प्रो कबड्डी लीगची 9 सेशन्स अर्थात 9 सत्रं होतील
  • फ्रँचायजींना खेळाडू खरेदी करण्याची संधी दिली जाईल

plan to start womens pro kabaddi league like womens ipl : महिलांच्या आयपीएल (Indian Premier League : IPL) प्रमाणे लवकरच महिलांची प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League : PKL) सुरू होणार आहे. आयपीएल काउन्सिलने महिलांच्या आयपीएलला वुमेन्स प्रीमिअर लीग (Women's Premier League : WPL) असे नाव दिले आहे. याच पद्धतीने महिलांच्या प्रो कबड्डी लीगला काय नाव दिले जाणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. पण लवकरच हे नाव जाहीर केले जाईल. 

महिलांच्या प्रो कबड्डी लीगची 9 सेशन्स अर्थात 9 सत्रं होतील. यात व्यावसायिक महिला कबड्डीपटू खेळतील. टीम तयार करण्यासाठी फ्रँचायजींना खेळाडू खरेदी करण्याची संधी दिली जाईल. अॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (Amateur Kabaddi Federation of India : AKFI) आणि आंतरराष्ट्री कबड्डी महासंघ (International Kabaddi Federation : IKF) यांच्या सहकार्याने महिलांच्या प्रो कबड्डी लीगचे आयोजन केले जाईल. ही माहिती प्रो कबड्डी लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी दिली.

महिलांची प्रो कबड्डी लीग खेळवण्यासाठी 2016 मध्ये मशाल स्पोर्ट्सने एक प्रयोग करून बघितला होता. या प्रायोगिक महिला कबड्डी स्पर्धेत फायरबर्ड्स, आइसडीवास आणि स्टॉर्मक्वीन्स या 3 टीम सहभागी झाल्या होत्या. 

महिला कबड्डीपटूंनी मशाल स्पोर्ट्सच्या घोषणेचे स्वागत केले आहे. महिलांच्या प्रो कबड्डी लीगच्या निमित्ताने जास्तीत जास्त गुणी महिला कबड्डीपटूंना खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वास महिला कबड्डीपटूंनी व्यक्त केला.

Holi : होळीनिमित्त दारापुढे काढा ही रांगोळी

हे अज्ञात सत्य तुम्हाला माहिती आहे का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी