पंतप्रधान मोदींनी ४० खेळांडूसोबत केली बातचित, पाहा काय म्हणाला सचिन या चर्चेवर...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 03, 2020 | 20:55 IST | टाइम्स नाऊ हिंदी

PM Narendra Modi interacts with Sachin Tendulkar and other sportsman: मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर आपली प्रतिक्रिया दिलीय. जाणून घ्या काय म्हणाला सचिन...

PM Modi and Sachin tendulkar
पंतप्रधान मोदींनी ४० खेळांडूसोबत केली बातचित, सचिन म्हणाला...  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ४० खेळाडूंसोबत चर्चा
  • चर्चेनंतर सचिन तेंडुलकर सांगितली महत्त्वाची गोष्ट
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी खेळाडूंसोबत चर्चा

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केलीय. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. देशातील सद्यस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी तब्बल १ तास या खेळाडूंसोबत चर्चा केली. सचिननं याबाबत सांगितलं की, १४ एप्रिलनंतर म्हणजेच लॉकडाऊन संपल्यानंतरचा काळ कोरोना व्हायरस या महामारी विरोधात लढ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

भारतात आतापर्यंत २००० हून अधिक कोरोना संक्रमित पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि ५० हून अधिक रुग्णांचा यात मृत्यू झालाय. सचिन तेंडुलकरनं पंतप्रधानांसोबतच्या चर्चेबाबत सांगितलं की, ‘त्यांनी म्हणजेच पंतप्रधान मोदींनी माझ्या संशय स्पष्ट केला की, आपल्याला १४ एप्रिलनंतरही निश्चिंत होता येणार नाहीय. यानंतरचाच काळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.’

सर्व नागरिकांसारखंच सचिन तेंडुलकर सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहेत. कुणासोबतही शेक हँड न करता हात जोडून नमस्कार करतोय.

त्यांनी सांगितलं, ‘मी हे सुद्धा सांगितलं की, मला जिथं जिथं शक्य असेल, याच पद्धतीनं नमस्कार करतो. महामारीतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा.’ मोदींनी हे सुद्धा सांगितलं की, या वेळी वृद्धांचं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसंच पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘हा असा काळ आहे की, या काळात वृद्ध व्यक्तींसोबत राहावं, त्यांचे अनुभव आणि त्यांच्याकडून गोष्टी ऐकाव्यात.’

त्यांनी सांगितलं, ‘सध्याच्या काळात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं ठेवण्यावर भर द्यावी लागणार आहे. आपण एका टीमच्या भावनेनं एका टीमच्या रुपात काम करत देशातून ही महामारी हाकलून लावायची आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी