कॉमनवेल्थमध्ये मेडल जिंकणाऱ्या या खेळाडूला मोदी म्हणाले 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 09, 2022 | 19:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prime Minister Modi on CWG 2022 Winners: भारती खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्सच्या शेवटच्या दिवशी धमाल केली. भारताच्या खात्यात सोमवारी ६ पदके आली. यात चार गोल्ड मेडलचा समावेश आहे. 

pm modi
CWG: या खेळाडूला मोदी म्हणाले 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' 
थोडं पण कामाचं
  • बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२
  • भारताने या स्पर्धेत एकूण ६१ मेडल जिंकली
  • शेवटच्या दिवशी ६ मेडल्सना गवसणी

बर्मिंगहॅम: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) सोमवारी कॉमनवेल्थ गेम्सच्या(commonwealth games 2022) शेवटच्या दिवशी मेडल्स जिंकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू(pv sindhu) आणि दिग्गज टेबल टेनिस खेळाडू अचंता शरत कमलसह कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल्स जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जगातील सातव्या स्थानावरील सिंधूने जगात १३व्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या मिशेल लीला २१-१५, २१-१३ असे हरवत आपले पहिले सिंगल गोल्ड मेडल जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधूला चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन म्हटले. Pm Modi praise players who won medal on last day of commonwealth games 2022

अधिक वाचा  - नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपला हादरा

मोदींनी ट्वीट केले, जबरदस्त पी व्ही सिंधू चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स आहे. ती नेहमी दाखवून देते की ती उत्कृष्ट खेळाडू का आहे. तिचे समर्पण आणि प्रतिबद्धता प्रेरणादायी आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल अभिनंदन आणि भविष्यासाठीही शुभेच्छा. गोल्ड मेडल जिंकण्यासाठी शरत कमलचे अभिनंदन करत मोदींनी ट्वीट केले, शरत कमलचे गोल्ड मेडलला इतिहासात एका विशेष पदकाचा दर्जा मिळेल. त्याने धैर्य, प्रतिबद्धता आणि लवचिकतेची ताकद दाखवली. त्याने शानदार कौशल्य दाखवले. यामुळे भारतात टेबल टेनिसला प्रोत्साहन मिळेल. 

शरतने टेबल टेनिसच्या पुरुषांच्या सिंगल्स फायनलमध्ये आपल्यापेक्षा चांगल्या रँकिंगच्या खेळाडूविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन करताना ११-१३, ११-, ११-२, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. बॅडमिंटनच्या पुरुष सिंगल्यस्चाय फायनलमध्ये जगातील १०व्या स्थानाचा खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्य पदक विजेता लक्ष्य सेनने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करताना मलेशियाच्या जगातील ४२व्या स्थानावरील खेळाडू एनजी टीजे योगला १९-२१, २१-१९, २१-६ असे हरवले. 

मोदींनी ट्वीट करत लक्ष्य सेनचेही कौतुक केले. लक्ष्य सेनने मिळवलेल्या यशाने आनंदित आहे. बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल अभिनंदन. त्याने संपूर्ण कॉमनवेल्थ गेम्समद्ये शानदार खेळ आणि फायनलमध्ये जबरदस्त खेळ केला. तो भारताची शान आहे. त्याला भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा. 

भारतीय बॅडमिंटन संघ तसेच सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या पुरुष जोडीचेही मोदींनी कौतुक केले. यावेळी ट्वीट करत म्हणाले, भारतीय बॅडमिंटनमध्ये यश आणि उत्कृष्टतेला नवी परिभाषा मिळाली. सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टीने टीम वर्क आणि निपुणतेचा शानदार नमुना सादर केला. गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल त्यांच्यावर गर्व आहे. ते भारतासाठी असेच यशाचे क्षण आणतील अशी आशा आहे. 

अधिक वाचा - विधानपरिषद निवडणुकीत सहा काँग्रेस आमदारांकडून क्रॉस वोटिंग

सात्विक आणि चिराग या जगातील सातव्या स्थानावरील जोडीने पुरुष डबल्स फायनलमध्ये बेन लेन आणि सीन वेंडी या इंग्लंडच्या १९व्या स्थानावरील जोडीला २१-१५, २१-१३ असे हरवत गोल्ड मेडल जिंकले. टेबल टेनिस पुरुष सिंगल्समध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल साथियानलाही शुभेच्छा दिल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी