Women's T20 World Cup: इतक्या वेळा मिस केली पूनम यादवने हॅट्ट्रीक, आज भारताला मिळवून दिला पहिला विजय 

भारतीय महिला संघाची लेग स्पीनर पूनम यादवने एकट्याच्या जीवावर भारतीय टीमला महिला टी २० वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला आहे. 

poonam yadav turned the t20 world cup match in indias favour against australia indw vs ausw cricket news in marathi tcri 11
Women's T20 World Cup: इतक्या वेळा मिस केली पूनम यादवने हॅट्ट्रीक, आज भारताला मिळवून दिला पहिला विजय  

सिडनी :  भारतीय महिला संघाची लेग स्पीनर पूनम यादवने एकट्याच्या जीवावर भारतीय टीमला महिला टी २० वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यात भारताची सुरूवात चांगली राहिली. पहिल्या ४ षटकात नाबाद ४० धावा बनवल्या होत्या. पण त्यानंतर लागोपाठ तीव विकेट गेल्या. त्यानंतर दीप्ती शर्माच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात १३२ धावा उभारल्या. 

विजयासाठी १३३ धावांचा पाठलाग करणाऱ्या यजमान संघाचीही सुरूवात चांगली राहिली. भारताला पहिले यश सहाव्या षटकात बेथ मूनीच्या रुपाने मिळाले, तिला शिखा पांडेने बाद केले. त्यानंतर ओपनर एलिसा हिलीने धमाकेदार फलंदाजी करून स्कोअरबोर्ड पुढे सरकवला. पण ५० धावा पूर्ण केल्यावर कर्णधार मेग लेनिंग राजेश्वरी गायकवाडच्या चेंडूवर विकेटकीपर तानिया भाटियाकडे झेलबाद झाली. 

एलिसा हेली पहिली शिकार 

कर्णधार लिनिंग बाद झाल्यावर भारतासमोर सर्वात मोठी अडचण एलिसा हिली होती. अशात कर्णधार हरमनप्रीतने लेग स्पिनर पूनम यादवकडे चेंडू दिला. यादवने ओव्हरच्या चार चेंडूत एलिसा आणि हेन्सने मिळून ९ धावा घेतल्या. हिलीने षटकार मारू आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्याच्या दुसऱ्या चेंडूवर हेलीने पूनम यादवलाच समोर कॅच दिला. हिलीने ३५ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. 

हॅट्रीक केली पुन्हा मिस 

यानंतर आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पूनम यादवने रिचर्ड्स हेन्स (६) ला स्टंपिंग केले आणि पुढच्याच चेंडूवर स्टार खेळाडू एलिसा पेरीला तिच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले. यावेळी ती हॅट्ट्र्रीकवर होती. हॅट्ट्रीक चेंडूवर समोर जॅनसन होती. पूनमने पुन्हा एकदा गुगली टाकून बॅटची कड घेतली होती. पण तानिया भाटिया विकेट मागे कॅच पकडू शकली नाही. त्यामुळे पूनमला वर्ल्ड कपच्या हॅट्ट्रीकपासून दूर राहावे लागले. दोन ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन पूनम सामन्याचे पारडे भारताकडे झुकवले. ऑस्ट्रेलिया १२ षटकात ५ बाद ७६ स्कोअर होता. 

आतापर्यंत मी तिसऱ्यांदा हॅट्ट्रीक पासून दूर राहिली आहे. पण देव ग्रेट आहे. तो ते पूर्ण करून घेईल अशी प्रतिक्रिया पूनम यादव हिने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. तिला आपल्या शानदार चार ओव्हर ४ विकेट आणि १९ धावांसाठी प्लेअर ऑफ द मॅच निवडण्यात आले. 

दोन टप्प्यांच्या चेंडूवरही घेतली विकेट 

यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये पूनमने आपल्या फिरकीचा कहर कायम ठेवला आणि जेन जेनसन हिला पॅव्हेलियनला धाडले आणि आपली चौथी विकेट घेतली. पाचव्या विकेट आपल्या चौथ्या ओव्हरमध्ये घेतली होती. पण एश्ले गार्डनर ही बोल्ड झाली तो चेंडू दोन टप्प्यांचा होता. त्यामुळे अंपारर्सने त्याला नो बॉल ठरवला. नाही तर पाच विकेट तिला मिळाले असते. या वर्ल्ड कपसाठी भारताने पूनम यादवच्या फिरकीमुळे विजयी सुरूवात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...