amercian adult star kendra lust : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने आपल्या तुफानी फलंदाजीने केवळ भारतातच नाही तर परदेशातही चाहते निर्माण केले आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून केकेआरला चमत्कारी विजय मिळवून दिल्याबद्दल अमेरिकेची प्रसिद्ध पॉर्न स्टार केंड्रा लस्टने रिंकू सिंगचे ट्विट करून कौतुक केले आहे. केंड्रा लस्टने या ट्विटसोबत रिंकू सिंगचा फोटोही शेअर केला आहे. (Porn star Kendra Lust shared Rinku Sharma's picture)
अधिक वाचा : आमचा Hitman लय पावरफुल ; म्हणून लागला पचास तोला entertainment
केंड्रा लस्टने रिंकूसाठी 'रिंकू-द किंग' लिहिले. अमेरिकेच्या या पाॅर्न स्टारने क्रिकेट आणि इतर खेळांसाठी ट्विट करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिने बॉलिवूड स्टार आणि केकेआरचा ऑनर शाहरुख खानबद्दल ट्विट केले होते. केंड्रा लस्टने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जेव्हा रिंकू सिंगने केकेआरसाठी आपल्या फलंदाजीने मनं जिंकली, तेव्हा लस्टने त्याच्यासाठीही ट्विट केले.
अधिक वाचा : Prithvi Shaw Selfie Case : पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, सपना गिलच्या याचिकेवर शॉसह 11 जणांना नोटीस
कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुजरात टायटन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात केकेआर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 204 धावा केल्या. या सामन्यात विजय शंकरने गुजरातकडून धडाकेबाज अर्धशतक झळकावले.
अधिक वाचा : हार्दिक पांड्याचा मैदानावर रुद्रावतार पाहून नेटकरी आवाक; व्हिडीओ तुफान व्हायरल
205 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची फलंदाजी सुरुवातीला निराशाजनक होती. संघाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. कारण या सामन्यात गुजरातचे कर्णधार असलेल्या राशिद खानने सलग तीन चेंडूत तीन विकेट घेत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. रशीदच्या हॅट्ट्रिकनंतर गुजरातच्या संघाने सामना पूर्णपणे जिंकल्याचा भास होत होता, पण शेवटी रिंकू सिंगच्या अप्रतिम कामगिरीने कलाटणी दिली.