IND vs SA: भारत (India) आणि दक्षिण अफ्रीका (South Africa) यांच्यात वनडे मालिकेची सुरूवात १९ जानेवारीपासून होत आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाला यजमान संघाकडून पराभव सहन करावा लागला. मात्र टीम इंडिया वनडे मालिका जिंकत विजयी निरोप घेण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाही आहे. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व लोकेश राहुल (KL Rahul)कडे सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उप कर्णधार बनवण्यात आले आहे. ही मालिका रोमहर्षक होईल अशी आशा आहे.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारीला पार्लच्या बोलँड पार्कमध्ये खेळवला जाईल. दुसरा वनडे सामना २१ जानेवारीला पार्ल्या बोलँड पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. तिसरा आणि अंतिम वनडे सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवला जाणार आहे.
भारताने द. आफ्रिकेच्या मागील दौऱ्यात वनडे मालिकेत विजय मिळवला होता. ६ सामन्यांच्या त्या मालिकेत भारतीय संघाने ५-१ असा विजय मिळवला होता. हाच इतिहास पुन्हा रिपीट करण्याचा भारत प्रयत्न करेल. युवा खेळाडूंनी भरलेल्या या मालिकेत टीम इंडियाकडे कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे.
लोकेश राहुल(कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत(विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, रवीचंद्रन अश्विन.
भारतीय संघासाठी वनडे मालिकेत विजय मिळवणे हे काही सोपे नाही. कारण कसोटी मालिकेत द. आफ्रिकेच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आफ्रिकेची वेगवान पिच गती आणि उसळीसाठी ओळखली जाते. तसेच यजमान संघाकडे चांगले गोलंदाज आहेत.