Indian ODI Team : जसप्रीत बुमराहपेक्षा आक्रमक गोलंदाजांचा संघात समावेश; कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यास सज्ज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 15, 2022 | 16:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian ODI Team Against South Africa | भारताला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या निर्णायक कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासोबतच यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २-० ने मालिकेवर कब्जा केला. दरम्यान कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघाला आफ्रिकेविरूध्द ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.

 Prasidh Krishna and Shardul Thakur have been included in the Indian squad for the ODI series against South Africa
जसप्रीत बुमराहपेक्षा आक्रमक गोलंदाजांचा संघात समावेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाला आफ्रिकेविरूध्द ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.
  • शार्दुल ठाकुर आणि प्रसिध्द कृष्णा यांचा एकदिवसीय संघात समावेश झाला आहे.
  • के.एल राहुलकडे कर्णधारपद तर बुमराहकडे उपकर्णधारपदाची धुरा असणार आहे.

Indian ODI Team Against South Africa | नवी दिल्ली : भारताला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या निर्णायक कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासोबतच यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २-० ने मालिकेवर कब्जा केला. दरम्यान कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघाला आफ्रिकेविरूध्द ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. दुखापतीने ग्रस्त असलेल्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी के.एल राहुलला (KL Rahul) कर्णधार बनवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) उपकर्णधार (Vice Captain) पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे एकदिवसीय संघात दोन आक्रमक गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या गोलंदाजांमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. तसेच आगामी मालिकेत या गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ कसोटी मालिकेतील बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.(Prasidh Krishna and Shardul Thakur have been included in the Indian squad for the ODI series against South Africa).  

संघात २ आक्रमक गोलंदाजांचा समावेश 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात काही दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. संघात शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांचे पुनरागमन झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे या खेळाडूंकडे आपली प्रतिभा दाखवण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तर आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार खेळी करणाऱ्या काही आक्रमक युवा गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शार्दुल ठाकुर आणि प्रसिध्द कृष्णा यांचा समावेश आहे. 

१. शार्दुल ठाकुर 

मागील काही कालावधीपासून शार्दुल ठाकुरने (Shardul Thakur) भारतीय संघात आपली एक अलग ओळख निर्माण केली आहे. शार्दुल आयपीएलमध्ये (IPL) धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने भारतीय संघासाठी खेळताना १५ एकदिवसीय सामन्यात २२ आणि २४ टी-२० सामन्यात ३१ बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकुर दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर आपल्या गोलंदाजीने घातक गोलंदाजी करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात या खेळाडूने एका डावात ७ बळी घेत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. अशा परिस्थितीत तो गोलंदाजीच्या आक्रमणाचे नेतृत्व करू शकतो आणि भारतीय संघाच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सिध्द करु शकतो.

२. प्रसिध्द कृष्णा 

आयपीएलमधील स्टार गोलंदाज प्रसिध्द कृष्णाची (Prasidh Krishna) न्यूझीलंडविरूध्दच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र या आक्रमक गोलंदाजाला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कृष्णाने आयपीएलमध्ये घातक गोलंदाजी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने मागील वर्षी भारतासाठी पदार्पण केले आणि ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६ बळी घेतले आहेत. प्रसिद्ध कृष्णा त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याची लाईन लेन्थ अगदी परफेक्ट आहे. त्याच्याकडे पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बळी घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकेसाठी कृष्णा भारतीय वेगवान गोलंदाजीची कमान ठरू शकतो.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ 

के.एल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी