Who is Sapna Gill: क्रिकेटर पृथ्वी शॉ हा सध्या चर्चेत आला आहे तो म्हणजे एका वादामुळे.... पृथ्वी शॉ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही चाहत्यांनी पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढण्याची मागणी केली मात्र, त्यांना नकार देताच वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, काहींनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीची काच फोडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका महिला पृथ्वी शॉ सोबत हुज्जत घालताना दिसत आहे. ही घटना मुंबईत एअरपोर्ट जवळ असलेल्या एका आलिशान हॉटेलच्या परिसरात घडली.
या प्रकरणात पृथ्वी शॉ च्या मित्राने एफआयआर दाखल केली आहे. पृथ्वी शॉ याच्या मित्राने केलेल्या तक्रारीनुसार, मुंबई एअरपोर्टजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन चाहत्यांनी (एक पुरुष आणि एक महिला) पृथ्वी जवळ येऊन सेल्फी क्लिक करण्याची मागणी केली आणि त्यानंतर वाद झाला.
हे पण वाचा : या आजारांमुळे वाढते पोटाची चरबी
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हे प्रकरण एका सेल्फी क्लिक करण्यावरुन सुरू झाले. त्यानंतर वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, मुंबईतील रस्त्यावर पोहोचला. पृथ्वी शॉच्या मित्राची गाडी तोडली आणि 50,000 रुपयांची मागणी केल्याच्या आरोपात पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यांची नावे एफआयआरमध्ये आहेत त्यामध्ये शोभित ठाकूर आणि सपना गिल यांचा समावेश आहे.
हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् घोरण्याची समस्या करा दूर
सपना गिलने सर्व आरोप फेटाळले आहेत. तिच्या वकीलांनी दावा केला आहे की, पृथ्वी शॉ याने आधी मारहाण करण्यास सुरुवात केली. एका व्हिडिओत पृथ्वी शॉ याच्या हातात बेसबॉलची बॅट दिसत आहे.
हे पण वाचा : या कारणांमुळे होतो गर्भपात