फीट आहे का पृथ्वी शॉ?  वेस्ट इंडीज दौऱ्याच्या निवडीवर सस्पेन्स कायम 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 16, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

India's tour of West Indies: टेस्ट क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर भारतीय टीमने अनेक ओपनरला चान्स दिला आहे., पण कमी फलंदाज यात यशस्वी झाले आहेत. युवा फलंदाज पृथ्वी शॉने खूप प्रभावित केले आहे.

prithvi shaw
पृथ्वी शॉ  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई :  आयसीसी वर्ल्ड कप २०१९ चा रोमांच आता हळूहळू कमी होत असून आता क्रिकेट रसिकांचे लक्ष आगामी सिरीजवर लागू राहिले आहे. टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी-२०, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय टीम या दरम्यान मध्य क्रमातील फलंदाजीच्या समस्येवर तोड काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच एक मजबूत संघ बनविण्यावर संघाचे लक्ष्य असणार आहे. तसेच टेस्टमध्ये ओपनिंगची समस्याही गेल्या काही वर्षांपासून भेडसावत होती, त्याचा पर्यायही या वेस्ट इंडिज सिरीजमध्ये शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

कसोटी क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर भारतीय संघाला अनेक वर्षांपासून ओपनिंगची समस्या भेडसावत होती. यासाठी टीम इंडियाने अनेक कॉबिनेशन करून पाहिले. पण त्यात फार थोड्या फलंदाजांना यश आले. युवा फलंदाज पृथ्वी शॉने या फलंदाजात सर्वांना प्रभावित केले आहे. पण आगामी दौऱ्यासाठी त्याच्या निवडीवर सस्पेन्स निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी राजकोटमध्ये पृथ्वी शॉने पदार्पण करत टेस्टमध्ये शतक झळकावले होते. पण असे काय झाले की त्याच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम आहे. जाणून घ्या.


क्या फिट नाही पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉला मुंबई प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये माकड हाडाला जखम झाली होती. त्यामुळे या युवा फलंदाजाला टेस्ट सिरीज खेळणे अवघड दिसते आहे. शॉने दुखापत झाली असताना ५५ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली होती आणि आपला संघ नॉर्थ पँथर्सला विजय मिळवून दिला होता. १९ वर्षीय पृथ्वी आता दुखापतीतून बरा झाला नाही. 

शॉन स्वतः एका वेबसाइटला आपल्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की, मी १०० टक्के फीट नाही, मला माहिती नाही की किती कालावधी लागेल मला फिट व्हायला. फिट होण्याची प्रक्रिया सुरू आहे. फिटनेस प्राप्त करण्यासाठी फिजिओसोबत काम सुरू आहे. त्यामुळे मला नाही माहिती की काळात मी बरा होईल. 

भारतीय टीम वेस्ट इंडिज दौऱ्यात सुरूवातीला तीन टी-२० आंतरराष्ट्रीय आणि तीन वन डे सामने खेळणार आहेत. त्यामुळे पृथ्वीकडे फिट होण्यासाठी पुरेसा कालवधी आहे. या शक्यतेबाबत मुंबईच्या या फलंदाजाने म्हटले की, होय, हे खरे आहे, वेळ आहे. पण याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, पाहू या का होते. 

छोट्या करियरमध्ये दुखापतींशी घट्ट नाते... 

पृथ्वी शॉच्या छोट्या करीअरमध्ये त्याला दुखापतींचा सामना करावा लागला आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध भारतातील सिरीजमध्ये शतक झळावल्या पुन्हा ९२ धावांची खेळी करणाऱ्या या युवा खेळाडूने भारताकडून एकही टेस्ट सामना खेळला नाही. पृथ्वीचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिलेक्शन झाले होते. मुरली विजय किंवा के एल राहुल सोबत ओपनिंग करणे जवळपास ठरले होते. पण सराव सामन्यात तो जखमी झाला आणि चार सामन्याच्या सिरीजमधून बाहेर झाला. पृथ्वीच्या ऐवजी मयांक अग्रवाल याला संघात सामील करण्यात आले. त्याने चांगली खेळी करून स्वतःला सिद्ध केले. 

पृथ्वी जर फीट झाला नाही तर...

जर पृथ्वी शॉ योग्य वेळी बरा झाला नाहीत त्याच्या जागी टीम इंडियात कोणाला संधी मिळेल हा प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे. अशात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर करण्यात आलेला मुरली विजय किंवा अंगठ्याच्या दुखापतीतून बाहेर येणाऱ्या शिखर धवनचे पुन्हा टीम इंडियात पुनरागमन होऊ शकते. 

विशेष म्हणजे विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर नाही जाणार आहे. वर्ल्ड कपनंतर योग्य आराम करण्यासाठी त्याला ब्रेक देण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय टेस्ट ओपिनिंग जोडीवर आता संपूर्ण लक्ष असणार आहे. धवन आणि विजय परदेशात धावा काढण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
फीट आहे का पृथ्वी शॉ?  वेस्ट इंडीज दौऱ्याच्या निवडीवर सस्पेन्स कायम  Description: India's tour of West Indies: टेस्ट क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर भारतीय टीमने अनेक ओपनरला चान्स दिला आहे., पण कमी फलंदाज यात यशस्वी झाले आहेत. युवा फलंदाज पृथ्वी शॉने खूप प्रभावित केले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles