मुंबई: युवा क्रिकेटर पृथ्वी शॉच्या(prithvi shaw) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील(australia tour) खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून पृथ्वी शॉला बाहेर काढण्यात आले होते. तो या दौऱ्यातील एका सामन्यात अॅडलेडमधील सामन्यात काही खास कामगिरी करूशकला नव्हता. आता पृथ्वी शॉने पुन्हा पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. विजय हजारे ट्रॉफीममधील(vijay hazare trophy) मुंबईसाठी डावाची सुरूवात करताना त्याने नाबाद शतक झळकावले. पृथ्वी शॉने दिल्लीविरोधात हे शतक ठोकले. त्याने ८९ चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावा केल्या. यामुळे मुंबईने सात विकेटनी दिल्लीला मात दिली. मुंबईने २१२ धावांचे लक्ष्य ३२व्या षटकातच पूर्ण केले.
पृथ्वी शॉला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फुल फॉर्ममध्ये दिसला. त्याने यशस्वी जयस्वालच्या रूपात पहिला साथीदार गमावला. त्यानंतर त्याने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावा केल्या. अय्यर सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. अय्यर आणि शॉ दोघेही आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतात. अय्यरच्या जाण्यानंतर पृथ्वी शॉने सूर्यकुमारसोबत धावा केल्या. दोघांनी वेगाने धावा केल्या. या दरम्यान शॉने ८३ चेंडूत शतक पूर्णकेले. तर सूर्याने ३२ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या साथीने पन्नास धावा पूर्ण केल्या.
अखेर शॉने ८९ चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०५ नाबाद धावा केल्या. तर शिवम दुबेने एका षटकार खेचत नऊ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच मुंबईने विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजयासह आपले खाते खोलले. तर दिल्लीला पराभवासोबत सुरूवात करावी लागली. सलामीवीर शिखर धवनने खाते न खोलता बाद झाला. मात्र २४ वर्षीय फलंदाज हिम्मक सिंह आणि शिवांक वासिष्ठ यांच्या डावाच्या जोरावर दिल्लीने २११ धावा केल्या.