Prithvi Shaw Selfie Case : पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, सपना गिलच्या याचिकेवर शॉसह 11 जणांना नोटीस

क्रिकेटमधील (Cricket) खराब फॉर्म चालू असताना पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सेल्फी वादात पृथ्वी शॉसह 11 जणांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता त्यांना लवकरात लवकर उत्तर द्यावं लागणार आहे. कर्तव्य नीट न बजावल्याने हायकोर्टाने दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे.

Prithvi Shaw Selfie Case
सपना गिलच्या याचिकेवर शॉसह 11 जणांना नोटीस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पृथ्वी शॉचा एका तरुणीसोबतचा सेल्फी घेण्यावरून झालेला वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
  • सपनाच्या मागणीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली.
  • पृथ्वी शॉवर विनयभंग आणि बॅटने मारहाण केल्याचा आरोप केला होता.

मुंबई :  सध्या सुरु असलेल्या IPL च्या 16व्या हंगामाच्या मध्यावर पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अडचणीत वाढ झाली आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्येही त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही. क्रिकेटमधील (Cricket) खराब फॉर्म चालू असताना पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सेल्फी वादात पृथ्वी शॉसह 11 जणांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता त्यांना लवकरात लवकर उत्तर द्यावं लागणार आहे. कर्तव्य नीट न बजावल्याने हायकोर्टाने दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे. ( Prithvi Shaw Selfie Case : notice to 11 people including Shaw on Sapna Gill's plea)

अधिक वाचा  : या स्टार किड्सला नाही आवडत अभिनय क्षेत्र
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पृथ्वी शॉचा एका तरुणीसोबतचा सेल्फी घेण्यावरून झालेला वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. पृथ्वी शॉने सपना गिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर सपना गिलला तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर तिला या प्रकरणी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर सपनाने पृथ्वीच्या अडचणी वाढवल्या आहेत. तिच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर सपनाच्या मागणीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली. 

अधिक वाचा  : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम


काय आहे प्रकरण 

फेब्रुवारी महिन्यात पृथ्वी शॉ मुंबईतील एका हॉटेलमध्ये त्याच्या मित्रांसोबत जेवायला गेला होता. तेथे सेल्फी घेण्यावरून शॉचा सपना गिलसोबत वाद झाला. दोघांमधील हाणामारीचा व्हिडिओही समोर आला आहे. शॉने आरोप केला होता की, गिल आणि तिच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला आणि फोटोसाठी पोझ देण्यास नकार दिल्याने त्याच्या कारची विंडशील्ड तोडली. त्यानंतर पोलिसांनी सपना आणि तिच्या एका मित्राविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना अटक केली.

अधिक वाचा  :हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी

त्याचवेळी सपना गिलने तिच्याविरोधातील एफआयआरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्याने पृथ्वी शॉवर विनयभंग आणि बॅटने मारहाण केल्याचा आरोप केला होता. याच याचिकेच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी