OMG : पिता-पुत्राची अनोखी जोडी; एकच संघ, समान स्थान, प्रत्येक सामन्यांत एकमेकांना करतात रिप्लेस

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 28, 2022 | 12:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pro Kabaddi Leauge | क्रीडा क्षेत्र खूप आकर्षित आणि आवड निर्माण करून घेणारे आहे, या क्षेत्रात अनेक विक्रम झाले आणि मोडले देखील. या क्रीडा जगाचे स्वतःचे साहस आहे, म्हणूनच समाजातील एक मोठा वर्ग खेळाशी संबंधित जोडला आहे. मात्र काही खेळातील खेळाडूंबाबत असे पैलू असतात की त्याची ओळख आजवरच्या क्रीडा इतिहासात क्वचितच आढळते. त्यातीलच एक म्हणजे पिता आणि मुलगा एकाच संघात खेळत असल्याबद्दलचा एक पैलू.

Pro-Kabaddi League Joginder Narwal and his son are playing in the same team and one position
पिता-पुत्राची अनोखी जोडी; एकाच संघात खेळतात एकाच पोझिशनवर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • क्रीडा क्षेत्रात पिता-पुत्र एकाच वेळी एकाच संघात खेळत असल्याचे फार कमी प्रमाणात पाहायला मिळते.
  • सध्या बंगळुरू येथे प्रो-कबड्डीच्या आठव्या हंगामाचा थरार रंगला आहे.
  • दबंग दिल्लीच्या संघात जोंगिदर नरवाल आणि त्याचा मुलगा विनय हे एकाच संघातून एकाच पोझिशनवर खेळत आहेत.

Pro Kabaddi Leauge | बंगळुरू :  क्रीडा क्षेत्र खूप आकर्षित आणि आवड निर्माण करून घेणारे आहे, या क्षेत्रात अनेक विक्रम झाले आणि मोडले देखील. या क्रीडा जगाचे स्वतःचे साहस आहे, म्हणूनच समाजातील एक मोठा वर्ग खेळाशी संबंधित जोडला आहे. मात्र काही खेळातील खेळाडूंबाबत असे पैलू असतात की त्याची ओळख आजवरच्या क्रीडा इतिहासात क्वचितच आढळते. त्यातीलच एक म्हणजे पिता आणि मुलगा एकाच संघात खेळत असल्याबद्दलचा एक पैलू. वडील आणि मुलाने एकाच संघासोबत वेगवेगळ्या वेळी खेळल्याची प्रकरणे सहज पाहायला मिळतात. पण एकाच वेळी एकाच संघातून अन् त्याच पोझिशनमधून खेळणे. गंमत म्हणजे एका वेळी एकच खेळाडू या पोझिशनवरून (Position) खेळू शकतो. म्हणजे बाप खेळतो तेव्हा मुलगा बाहेर बसतो. जेव्हा मुलगा स्पर्धेत उतरतो तेव्हा तो वडिलांची जागा घेतो. (Pro-Kabaddi League Joginder Narwal and his son are playing in the same team and one position).

अधिक वाचा : महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात

आपल्या देशात आपण दोन भावांना वेगवेगळ्या खेळात एकत्र खेळताना पाहिले, बहिणीही एकाच खेळात किंवा इतर कोणत्याही खेळात भाग घेताना दिसल्या. पण आई-मुलगा आणि वडील-मुलगा कधी खेळात एकत्र दिसले नाहीत, मात्र काही खेळात वरच्या स्तरावर खेळताना दिसले आहेत.

अलीकडेच भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रीतम सिवाच यांचा मुलगा यशदीप याने देशासाठी हॉकीमधील ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला, त्यानंतर ही आई आणि मुलाची जोडी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तर क्रिकेटमध्ये सुरिंदर अमरनाथ यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पदार्पण केले होते आणि १९६३ मध्ये त्याच प्रथम श्रेणी सामन्यात लाला अमरनाथ विरुद्ध संघासोबत खेळत होते. 

अधिक वाचा : विद्यार्थ्यांसाठी आज बिहार बंद, कडेकोट पोलीस बंदोबस्त

तेव्हा लालाजींचे वय ५२ वर्षे होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अशी उदाहरणे फार पूर्वी पाहायला मिळतात. डेनिस आणि हीथ स्ट्रीक यांनी क्रिकेटमध्ये १९९६ मध्ये हा कारनामा केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉलमध्ये अशी मोजकीच उदाहरणे आहेत, पण भारतातील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय खेळांमध्ये असे खूप कमी पाहायला मिळते. म्हणजेच पिता-पुत्र एकत्र खेळण्याचा अभिमान अवघ्या चार वर्षांच्या अंतराने हुकला. बेसबॉल लीगमध्ये केन ग्रिफी आणि त्याचे वडील केन ग्रिफी सीनियर १९९० मध्ये सिएटल मरिनर्ससाठी एकत्र खेळले. तसेच आजच्या घडीला देखील काही उदाहरणे पाहायला मिळतात.

प्रो-कबड्डीने दिली पिता-पुत्राची नवीन जोडी 

आपण ज्या आजच्या घडीच्या जोडीबद्दल भाष्य करत आहोत ही पिता-पुत्राची जोडी एकाच खेळात सहभागी आहे. लक्षणीय बाब म्हणजे एकाच संघात सहभागी आहे आणि दोघेही एकाच स्थितीत खेळत आहेत. म्हणजेच कोणत्याही सामन्यात एकच सहभागी होईल आणि दुसऱ्याला बाहेर बसावे लागेल. विशेष म्हणजे जो बाहेर बसेल त्याला काही हरकत नसावी कारण त्याचाच आपला कोणीतरी विजयासाठी प्रयत्न करत आहे.

विनय आणि जोगिंदरची जोडी ठरते लोकप्रिय

सध्या बंगळुरू येथे प्रो-कबड्डीच्या आठव्या हंगामाचा थरार रंगला आहे. प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात दबंग दिल्लीच्या कॉर्नवर आपल्या पाहायला मिळेल. एकतर जोगिंदर नरवाल ८ नंबरची जर्सी परिधान करेल किंवा त्यांचा मुलगा विनय ८८ नंबरची जर्सी परिधान करेल. पिता-पुत्राची जोडी खरोखरच शानदार आहे. जोगिंदरचे वय ३९ वर्षे आणि मुलगा विनय १९ वर्षांचा आहे. लहान वयात लग्न झाले आणि मुलगा खूप लवकर हाताशी आला. कबड्डीचा खेळ लहानणापासूनच जीवनाशी घट्ट जोडला गेला होता. कबड्डी हा खेळ एकेकाळी खेळाबरोबरच मनोरंजनाचे साधनही होता. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रिंधाना येथे जोगिंदरचे कुटुंब कबड्डी खेळत होते. त्यांचा मोठा भाऊ सुरिंदर हा एकेकाळी भारतीय कबड्डीचे नाव होते. विनयला लहानपणापासूनच कबड्डीचे आकर्षण होते.

अधिक वाचा : एमपीएससीच्या परीक्षेला स्थगिती

मात्र वडील आणि मुलगा एकाच संघात असल्याने आणि एकत्र खेळताना काही समस्या असू शकतात पण जोगिंदरला तसे वाटत नाही. तो म्हणतो की मुलगा संघात त्याच्या मित्रांसोबत राहतो, मी माझ्या मित्रांसोबत राहतो. प्रशिक्षकाला एखादी गोष्ट सांगायची किंवा समजावून सांगायची असते, तेव्हा एखाद्याला काही सांगून पुढच्या माणसाला वाईट वाटेल, असे किंचितही पाहिले जात नाही.

विनय सध्या शिक्षण घेतोय

"जोगिंदर सांगतो की मुलगा सध्या बीएचे शिक्षण घेत आहे, त्याला कबड्डीची खूप आवड आहे. तो फक्त खातो आणि खेळतो. जोगिंदरने फार पूर्वीपासून आठ नंबरची जर्सी परिधान केली होती, 'बाप शेर तर पोरगा सव्वाशेर' असेच काहीसे असावे म्हणून मुलाने देखील ८८ क्रमांकाला प्राधान्य दिले. विनयकडे खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तो त्याच्या वडिलांच्या प्रत्येक पध्दतीवर प्रत्येक चालीवर बारीक नजर ठेवतो."

अधिक वाचा : मुंबईकरांना 900 एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसची भेट

क्रिकेट आणि इतर खेळातील भाऊ आणि पिता पुत्र या जोडीबद्दल आपण नेहमीच खूप ऐकले आहे, परंतु अशी उदाहरणे आपल्या स्वदेशी मातीच्या खेळातही आहेत. सुरुवातीच्या हंगामात राम कुमार साह आणि श्याम कुमार साह हे दोन भाऊ खेळले, एक बंगाल वॉरियर्ससाठी तर दुसरा पटना पायरेट्ससाठी. याशिवाय नितीन मदने बंगालसाठी एक शानदार खेळाडू ठरत होता. मात्र दुखापतीमुळे त्याची कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही. दरम्यान त्याचा भाऊ कृष्णा मदने हा देखील तेलगू टायटन्ससाठी प्रो कबड्डी लीगचा भाग आहे. सध्या गुजरात जायंट्समध्ये दोन भावांची जोडी एकत्र खेळत आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी