बुद्धिबळ चॅम्पियन मलिका हांडाला नोकरी देण्यास पंजाब सरकारची ना; क्रीडामंत्री म्हणाले, तिची मूकबधिर क्रीडा क्षेत्रात कामगिरी

Seven-time National Chess Champion : नवीन वर्ष (New year) सुरू होऊन चार दिवस झाले आहेत. नवीन वर्षात चांगले दिवस यावी., आयुष्याची (Life) भरभराट व्हावी, अशी इच्छा सर्वजण व्यक्त करत असतात. परंतु या नव्या वर्षाची सुरुवात जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन (World Chess Champion) मलिका हांडासाठी (Malika Handa) वाईट ठरली आहे.

Chess champ Malika Handa
बुद्धिबळ चॅम्पियन मलिका हांडा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पंजाब राज्याचे क्रीडामंत्री म्हणाले मूकबधिर क्रीडा क्षेत्रात बक्षीस देण्याचं धोरण नाही.
  • ट्विटवर व्हिडिओ पोस्ट करत मलिका हांडाने पंजाब सरकारला धारेवर धरले आहे.
  • सप्टेंबर 2021 मध्ये, विशेष अपंग खेळाडूने पंजाबच्या क्रीडा मंत्रालयाच्या संचालकांकडे नोकरीची मागणी केली होती.

Chess champ Malika Handa : नवी दिल्ली :  नवीन वर्ष (New year) सुरू होऊन चार दिवस झाले आहेत. नवीन वर्षात चांगले दिवस यावी., आयुष्याची (Life) भरभराट व्हावी, अशी इच्छा सर्वजण व्यक्त करत असतात. परंतु या नव्या वर्षाची सुरुवात जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन (World Chess Champion) मलिका हांडासाठी (Malika Handa) वाईट ठरली आहे. वर्षाची सुरुवात वाईट होण्याचं कारण म्हणजे, पंजाब सरकारची (Government of Punjab) खोटी आश्वासने. पाच वर्षांपासून नोकरीचा पाठपुरावा करूनही नोकरी मिळत नसल्यानं निराश झालेल्या मलिकाला भविष्यात बुद्धीबळ (Chess) खेळू वाटतं नाहीये.

बुद्धिबळ चॅम्पियन असलेली मलिका हांडा हिने आपल्या खेळाच्या जोरावर भारत देशाचं नाव अख्या जगात पोहचवलं. जागतिक कर्णबधिर बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये (World Deaf Chess Championships) तिने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह भारताचा गौरव केला. परंतु देशाचे नाव शिखरावर नेणाऱ्या हांडाला नोकरीसाठी मात्र सरकार दरबारी घिरट्या घालाव्या लागत आहेत. 

साधरण पाच ते सहा वर्षांपासून मलिका हांडा नोकरीसाठी क्रीडा मंत्रालयाकडे नोकरीची मागणी करत आहे. परंतु सरकारने तिला तथ्य नसलेलं कारण देत बक्षीस नाकरलं. फक्त नोकरीच नाही तर रोख बक्षीस सुद्धा तिला मिळालेलं नाही.  मलिका हांडा यांच्या प्रश्नाविषयी बोलताना पंजाब राज्याचे क्रीडामंत्री म्हणाले की, मूकबधिर क्रीडा क्षेत्रात सरकारचे असे कोणतेही धोरण नाही. मलिका हांडा हिने जागतिक कर्णबधिर बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळवली आहेत. दरम्यान, सरकारकडून नोकरी आणि रोख बक्षीस देण्यास नकार मिळाल्यानं मलिका हांडा निराश झाली आहे. 

सोशल मीडियावर सरकारविरोधात संतापली बुद्धीबळ चॅम्पियन 

सातवेळा राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या हांडाने आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवा, यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. काँग्रेस सरकारच्या अनास्थेमुळे आपण दुखावले असल्याचे त्या म्हणाल्या. पंजाब सरकारने आपल्याला दिलेलं आश्वासन पाळले नसल्याचं दु:ख तिने ट्विट करत नागरिकांपुढे मांडले आहे.  हांडाने आपल्या पोस्टमध्ये 17-सेकंड-लांबीचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, पंजाबचे माजी क्रीडामंत्री राणा गुरमित सिंग सोधी यांनी रोख बक्षीस जाहीर केले होते आणि नोकरीचे वचनही दिले होते. तिने सांगितले की तिच्याकडे आमंत्रण पत्र आहे - जे नंतर कोविड-19 साथीच्या आजारामुळे रद्द करण्यात आले.

माजी क्रीडामंत्री भाजपमध्ये गेल्यानं बक्षीस रद्द  

दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निष्ठावंत सोढी यांनी मलिका हांडा हिला लेखी पत्राद्वारे नोकरी आणि रोख बक्षीस देण्याचं आश्वसन दिलं होतं. परंतु पंजाबमधील सत्ता राजकरणांच्या बदलामुळे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेस पक्ष सोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर गेल्या महिन्यात चरणजित सिंग चन्नी यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर सोढी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर बोलताना हांडा म्हणाली की, विद्यमान क्रीडा मंत्र्यांकडे नोकरीसाठी आवाहन केले, तेव्हा त्यांनी मदत नाकारली कारण ते माजी सरकारचे वचन होते. त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस सरकारने तिच्या आयुष्यातील पाच वर्षे वाया घालवली आणि तिला मूर्ख बनवले. 

कारण अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिला नोकरीचं आश्वसन दिलं होतं. दरम्यान सरकारवरील आपला रोष व्यक्त करण्यासाठी हांडाने ट्विट करत सरकार ताशोरे ओढली आहेत. चन्नी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ट्विटरवर टॅग करत, हांडा यांनी माजी पंजाब सरकारने पाठवलेले अधिकृत पत्र (पंजाबच्या क्रीडा संचालकांनी सही केलेले) पाठवलं आहे. याला जोड म्हणून सोमवारी, तिने "पुराव्या" चा आणखी एक 18-सेकंडाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला ज्यात असा दावा केला आहे की, बुद्धिबळपटूसाठी विशेष प्रकरणात क्रीडा मंत्री नोकरी आणि रोख बक्षीसाची व्यवस्था करतील.

यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये, विशेष अपंग खेळाडूने पंजाबच्या क्रीडा मंत्रालयाच्या संचालकांसमोर अश्रू ढाळत एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जिथे तिला प्रथम रोख पुरस्कार आणि नोकरी नाकारण्यात आली होती. तिने लिहिले होते की, "मी आता काय करू? माझे भविष्य उध्वस्त झाले आहे का?" 
हांडाच्या वेदनांनी व्यथित झालेले, राजकीय विश्लेषक आणि सामाजिक समालोचक आनंद रंगनाथन यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, त्यांना क्राउड-फंडिंगसाठी देणगी द्यायची आहे जी बुद्धिबळपटूला मदत करेल. २६ वर्षीय मलिका हांडाची आई रेणू हांडा यांनी एएनआयला सांगितले की, तिची मुलगी सरकारबद्दल इतकी निराश आहे की तिला आता "तिने बुद्धिबळ खेळत राहावे असे वाटत नाही".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी