IPL 2023, PBKS vs KKR : पंजाबने मोहाली जिंकली, कोलकातावर 7 रन्सने विजय

IPL 2023, Punjab Kings vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2023 मधील दुसरी मॅच पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाली.

Punjab Kings beat Kolkata Knight Riders
पंजाबचा कोलकातावर विजय (Photo: @IPL Twitter) 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल 2023 मधील दुसरी मॅच पंजाबने जिंकली
  • पंजाब किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 7 रन्सने विजय
  • मॅच अंतिम टप्प्यात असताना पावसाचा व्यत्यय

Punjab Kings beat Kolkata Knight Riders check scorecard: पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच पंजाबने जिंकली आहे. पंजाब किंग्सने प्रथम बॅटिंग करत 5 विकेट्स गमावत 191 रन्स पर्यंत मजल मारली. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमची सुरुवातच खराब झाली. अखेर पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. 16 ओव्हर्स झाल्यावर पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोअर 7 विकेट्सवर 146 रन्स इतका होता. पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर डकवर्थ लुईस नियमाने पंजाब किंग्सला विजयी जाहीर करण्यात आलं.

मॅचच्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या पंजाब किंग्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 191 रन्स केले. पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंग याने 23 रन्स करत माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन शिखर धवन आणि भानुका राजपक्षे या दोघांनी चांगली पार्टनरशिप करत मोठा स्कोअर उभा करण्यात मदत केली. शिखर धवनने 29 बॉल्समध्ये 40 रन्स केले आणि भानुका राजपक्षे याने 32 बॉल्समध्ये 50 रन्स केले. जितेश शर्मा याने 21 रन्स, सिकंदर रजाने 16 रन्स तर सॅम करनने नॉट आऊट 26 रन्स आणि शाहरूख खान याने 11 रन्स केले.

हे पण वाचा : भुवयांचे केस का गळतात?

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमकडून टीम साऊथी याने सर्वाधिक म्हणजेच दोन विकेट्स घेतल्या. टीम साऊथीने 4 ओव्हर्समध्ये 54 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादव, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हे पण वाचा : तुमची मुलं सर्व वस्तू फेकतात? मग हे करून पाहाच

पंजाब किंग्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमची सुरुवात खराब झाली. कोलकाताचा ओपनर बॅट्समन मनदीप सिंह अवघ्या दोन रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर अनुकूल रॉय सुद्धा चार रन्स करुन आऊट झाला. मग रहमानुल्लाह गुरबाज सुद्धा 22 रन्स करुन माघारी परतला. कॅप्टन नितीश राणा याने 24 रन्स केले. रिंकु सिंह याने 4 रन्स केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी