Push India Push Challenge, Push-Ups Competition News : 'पुश इंडिया पुश चॅलेंज' या क्रीडा महोत्सवात उत्तर प्रदेशच्या अविनाशकुमारने 161 पुश अप्स मारत स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. उद्घाटनाच्या दिवशी 206 पुश अप्स मारणारा अमरजीत मित्रा दुसर्या दिवसअखेर पुरुषांमध्ये आघाडीवर आहे. महिलांमध्ये शिवान्या जाधव 97 पुश अप्स मारून अव्वल स्थानावर आहे.
आदर्श सोमाणी यांनी आपले वडील राजेंद्र सोमाणी यांच्या स्मरणार्थ ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ उपक्रम सुरू केला आहे. मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या यंदाच्या ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’मध्ये 17 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.
रविवारी सर्वाधिक 161 पुश अप्स मारणारा अविनाश कुमार टॉप टेनमध्ये आठवा होता. अमरजीतला कडवी टक्कर देणारा शोभीत गुप्ता 203 पुशअप्स मारत दुसऱ्या स्थानावर आहे. महिलांमध्ये अद्याप ‘पुश अप’चे शतक कोणाला मारता आलेले नाही.
स्पर्धेचे तीन दिवस उरले आहेत. अमरजीत मित्रा आणि शोभीत गुप्ता यांच्या दोनशेहून अधिक पुशअप्सची कामगिरी कोण मागे टाकणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील फत्तेपूरच्या पाली गावातील रामू जाट या एका शेतकर्याच्या मुलाने अडीच हजार बैठका मारल्या. अखेर या मुलाला आयोजकांनीच थांबवले. आदर्श सोमानी यांनी रामू जाट व त्याचे वडील बाबूलाल यांचा दहा हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला. रामू कुठल्याही जिममध्ये जात नाही. पण घरी व्यायाम करून त्याने शारीरिक सामर्थ्य वाढवले आहे. या सामर्थ्याच्या जोरावरच त्याने अडीच हजार बैठका मारण्याचा पराक्रम केला.
IPL 2023 मध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या महिला