Happy Birthday PV Sindhu : 27 वर्षांची झाली पी.व्ही. सिंधू, जाणून घ्या सिंधूच्या कामगिरीचा जीवन प्रवास

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 जुलै 1995 रोजी हैदराबादमध्ये सिंधूचा जन्म (PV Sindhu Birthday) झाला. 2012 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत 20 व्या स्थानावर असताना सिंधूला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. वयाच्या 17 व्या वर्षी तिने ही कामगिरी केली आहे. 

Today is p. V. Sindhu's 27th birthday
आज आहे पी. व्ही. सिंधूचा 27 वा वाढदिवस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रशिक्षणासाठी दररोज 56 किलोमीटरपर्यंत प्रवास सिंधूला करावा लागत.
  • 2013 मध्ये पी. व्ही सिंधूने मलेशिया ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.

PV Sindhu Birthday : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 जुलै 1995 रोजी हैदराबादमध्ये सिंधूचा जन्म (PV Sindhu Birthday) झाला. 2012 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत 20 व्या स्थानावर असताना सिंधूला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. वयाच्या 17 व्या वर्षी तिने ही कामगिरी केली आहे. 

पी. व्ही सिंधूला खेळाचा वारसा लाभला तो म्हणजे तिच्या आई-वडिलांकडून. तिचे वडील पी. व्ही रामण्णा आणि आई पी विजया यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत व्हॉलीबॉल खेळले आहेत. बँडमिंटनमध्ये आवड ठेवणाऱ्या पी. व्ही सिंधूने या उंचीवर पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रशिक्षणासाठी दररोज 56 किलोमीटरपर्यंत प्रवास सिंधूला करावा लागत होता. ती रोज पहाटे 3 वाजता उठून ट्रेनिंग अकादमीत जात. तिचा प्रशिक्षण वर्ग पहाटे साडेचार वाजता सुरू व्हायचा. प्रशिक्षणानंतर ती सकाळी साडेआठ वाजता शाळेत जायची.  आताही दररोज सकाळी तीन तास कोर्टवर सराव. मग सायंकाळी तीन तास जीममध्ये व्यायाम. याला जोडून रोज दोन तास धावणं, वेट ट्रेनिंग आणि योग, मेडिटेशन हे सारं माझ्या नियमित रुटीनचा भाग आहे.

दरम्यान, आपण सिंधूच्या वाढदिवसानिमित्त (PV Sindhu Birthday Special) तिच्या आतापर्यंतच्या बॅडमिंटन कारकिर्दीवर जाणून घेणार आहोत.. 
आपल्या कामगिरी आणि स्टार खेळाडू होण्याविषयी सिंधू सांगते, एखादा खेळ आवडला आणि त्यात करिअर करायचं असं ठरवलं तरी प्रत्येक पदकामागे, यशामागे अनेक वर्षांची मेहनत, सराव, सातत्य असतं. एका रात्रीत कुणीच स्टार बनू शकत नाही. कधी लवकर यश मिळते, कधी वाट पाहावी लागते. हे सारं समजून आपल्या खेळावरच फोकस करायला हवा.

मलेशिया ओपन 2013 – सुवर्णपदक

2013 मध्ये पी. व्ही सिंधूने मलेशिया ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 

ग्वांगझू वर्ल्ड चॅम्पियनशिप 2013 – कांस्य पदक

यानंतर सिंधूने त्याच वर्षी म्हणजेच 2012 मध्ये पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले. चीनमधील ग्वांगझू येथे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आयोजित केलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. सिंधू जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. या सामन्यात तिने ऑलिम्पिक पदक विजेत्या व्हॅन एहानचा पराभव केला होता. 

डेन्मार्क ओपन सुपर सिरीज 2015 – रौप्य पदक

डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमध्ये सिंधू उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती कारण तिने अव्वल खेळाडू वांग इहानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यानंतर तिला अंतिम फेरी जिंकता आली नाही आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रिओ ऑलिम्पिक 2016 – रौप्य पदक

रिओ ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व गाजवताना सिंधूने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात नवा अध्याय जोडला. याशिवाय पीव्ही सिंधूने इंडिया ओपन 2017 मध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने ऑलिम्पिकची परतफेड तर केलीच पण इंडिया ओपन सुपरसिरीजच्या अंतिम फेरीत कॅरोलिना मारिनचा पराभव करून विजेतेपदही पटकावले. यानंतर 2019 मध्येही तिचा सुवर्ण प्रवास सुरू राहिला आणि मागच्या वर्षी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी