PV Sindhu News: पीव्ही सिंधूचा थायलंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 21, 2022 | 15:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

PV Sindhu Loses In Semi Finals | भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू शनिवारी उपांत्य फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन चेन यू फेईकडून सरळ गेम गमावल्यानंतर थायलंड ओपनमधून बाहेर पडली.

PV Sindhu defeated in the semifinals of Thailand Open
पीव्ही सिंधूचा थायलंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीव्ही सिंधूचा थायलंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव.
  • शनिवारी उपांत्य फेरीत चेन यू फेईकडून सरळ गेम गमावल्यानंतर सिंधू थायलंड ओपनमधून बाहेर पडली.
  • सहाव्या मानांकित सिंधूचा या सामन्यापूर्वी चेनविरुद्ध ६-४ असा विजयी विक्रम होता.

PV Sindhu Loses In Semi Finals | बँकॉक : भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू शनिवारी उपांत्य फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन चेन यू फेईकडून सरळ गेम गमावल्यानंतर थायलंड ओपनमधून बाहेर पडली. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला तिसर्‍या मानांकित चेनविरुद्ध १७-२१, १६-२१ अशा फरकाने ४३ व्या मिनिटांत पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे सुपर ५०० स्पर्धेतील तिचा गौरवशाली प्रवास संपुष्टात आला आहे. (PV Sindhu defeated in the semifinals of Thailand Open). 

अधिक वाचा : ठरलेलं लग्न पुन्हा-पुन्हा मोडतयं? तर मग करा हे उपाय

सिंधूची झुंज अपयशी 

सहाव्या मानांकित सिंधूचा या सामन्यापूर्वी चेनविरुद्ध ६-४ असा विजयी विक्रम होता, मात्र ती चीनच्या खेळाडूविरुद्ध तशी कामगिरी करू शकली नाही त्यामुळे तिला विजयापासून वंचित राहावे लागले. तर दुसरीकडे चेनने आक्रमक बॅडमिंटन खेळत विजय मिळवला. हैदराबादच्या २६ वर्षीय खेळाडूला २०१९ च्या BWF वर्ल्ड टूर फायनल्समध्ये चेनकडून शेवटचा पराभव पत्करावा लागला होता.

पहिल्या गेममध्ये ३-३ अशा बरोबरीनंतर ब्रेकपर्यंत सिंधू ७-११ अशी पिछाडीवर होती. चेनने रॅलींवर वर्चस्व कायम राखले आणि पाच गेम पॉइंट राखले. सिंधूने दोन गेम पॉइंट वाचवले पण चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने पहिला गेम सहज जिंकला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने दुसऱ्या गेममध्ये चांगला खेळ करत ६-३ अशी आघाडी घेतली आणि ब्रेकपर्यंत दोन गुणांची आघाडी घेतली.

सिंधूचे पुढील लक्ष्य इंडोनेशिया मास्टर्स 

जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या खेळाडूने लवकरच गेमवर कब्जा केला आणि १५-१२ अशा पॉइंटची आघाडी घेतली. यानंतर सिंधूला सामन्यात पुनरागमन करता आले नाही आणि चेनने चार मॅच पॉइंट मिळवत विजयाची नोंद केली. सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये या हंगामात दोन सुपर ३०० विजेतेपद जिंकणारी सिंधू आता जकार्ता येथे ७ ते १२ जून दरम्यान होणाऱ्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेत सहभागी होणार आहे.

पीव्

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी