PV Sindhu सिंधूचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपले

PV Sindhu loses in French Open semifinals भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान सेमी फायनलमध्ये संपले.

PV Sindhu loses in French Open semifinals
PV Sindhu सिंधूचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपले 
थोडं पण कामाचं
  • सिंधूचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपले
  • सेमी फायनलमध्ये जपानच्या सयाका ताकाहाशीने केला पराभव
  • ताकाहाशीने चौथ्यांदा केला सिंधूचा पराभव

PV Sindhu loses in French Open semifinals । पॅरिस: भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान सेमी फायनलमध्ये संपले. सेमी फायनलमध्ये सिंधूची टक्कर जपानच्या सयाका ताकाहाशी हिच्याशी झाली. या मॅचमध्ये सिंधूचा पराभव झाला. सिंधूने मॅच २१-१८, १६-२१, १२-२१ अशी गमावली. ताकाहाशी आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत झालेल्या आठ मॅचमध्ये चार वेळा सिंधूचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी सिंधूचे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान क्वार्टर फायनलमधील पराभवामुळे संपले होते. 

याआधी पुरुष एकेरीत (मेन्स सिंगल) क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लक्ष्य सेनचा पराभव झाला. दक्षिण कोरियाच्या हिओ वांगहीने लक्ष्यचा १७-२१, १५-२१ असा पराभव केला. यामुळे लक्ष्यचे आव्हान संपले. तसेच पुरुष दुहेरीत (मेन्स डबल्स) मलेशियाच्या आरोन चाय आणि सोह वूइ यिक या जोडीने भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा १८-२१, २१-१८, २१-१७ असा पराभव केला. यामुळे भारताचे पुरुष दुहेरीतले आव्हान संपले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी